मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई चे भूषण असलेल्या, ४४ वर्षे जुन्या अशा प्रतिष्ठित मराठी साहित्य,संस्कृती आणि कला मंडळ यांच्या वतीने माध्यमकर्मी देवेंद्र भुजबळ यांचा काल मंडळाच्या प्रमुख आधारस्तंभ प्रा अश्विनी बाचलकर यांच्याहस्ते ज्येष्ठ कवी श्री अरुण म्हात्रे आणि मंडळाचे अध्यक्ष श्री सुभाष कुळकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना श्री भुजबळ यांनी हा सत्कार म्हणजे घरचा सत्कार असल्याची भावना व्यक्त करून सर्व माध्यमे ही एकमेकांची स्पर्धक नसून प्रत्येकाचा वाचक, प्रेक्षक वर्ग हा स्वतंत्र असतो असे सांगितले. तसेच ज्या पिढीकडे मंत्र आहे,त्यांना आजचे तंत्र अवगत नाही तर ज्यांना हे तंत्र अवगत आहे, त्या आजच्या युवा पिढी कडे मंत्र नाही, असे निरीक्षण नोंदवून जेष्ठ व्यक्तींनी आजचे तंत्र अवगत करण्याची गरज स्पष्ट केली.
या सत्कारा नंतर शुभारंभाचा पहिलाच प्रयोग असलेला, अरुण म्हात्रे यांची संकल्पना, अशोक नायगावकर यांचा लेखन असलेला “गर्जतो मराठी, गुंजतो मराठी” हा मराठी गद्य, पद्य या वर आधारित कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.
कार्यक्रमास विविध मान्यवर, रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यूज स्टोरी टुडे : एक दृष्टिक्षेप
न्यूज स्टोरी टुडे www.newsstorytoday.com हे आंतरराष्ट्रीय मराठी वेबपोर्टल असून या पोर्टलची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या हे पोर्टल
८६ देशात पोहोचले आहे.तर ४ लाख ७६ हजाराहून अधिक याचे व्ह्युज आहेत.
मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, कला याचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी हे वेबपोर्टल महत्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे देश विदेशातील लेखक, कवी, वाचक, विविध क्षेत्रातील व्यक्ती या पोर्टलशी जोडल्या गेले आहेत आणि जोडले जात आहेत.
या पोर्टल वर आता पर्यंत ६०० कविता तर “वाचक लिहितात” या ७३ सदरातून वाचकांची जवळपास १००० पत्रे प्रसिध्द झाली आहेत.
प्रकाशित लेखमाला
१) ५० वर्षे इंग्रजीत पत्रकारिता केलेले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागाचे निवृत्त विभाग प्रमुख, प्रा डॉ किरण ठाकूर, पुणे यांची
“बातमीदारी करताना” : ३५ भाग
२) अमेरिका स्थित डॉ गौरी जोशी कंसारा यांची थोर कवी व त्यांच्या कवितांवर आधारित “मनातील कविता” :२४ भाग
३) सौ वर्षा महेंद्र भाबल, नवी मुंबई यांची “जीवन प्रवास”: ३७ भाग
४) निवृत्त डीवायएसपी सुनीता नाशिककर, मुंबई यांची “मी, पोलीस अधिकारी” : १५ भाग
५) वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुलांच्या जीवनावरील डॉ राणी खेडिकर यांची “लालबत्ती” : ४७ भाग.
६) प्रा विसुभाऊ बापट,मुंबई यांची “कुटूंब रंगलंय काव्यात” : ५३ भाग.
७) टिव्ही कलाकार गंधे काका, मुंबई यांची गिरनार परिक्रमा : ७ भाग
८) निवृत्त पुराभिलेख संचालक डॉ भास्कर धाटावकर, मुंबई यांची “माझी कॅनडा अमेरिका सफर” : ११ भाग
९) लेखिका प्रतिभा चांदूरकर, ठाणे यांची कथा माला,
स्वप्नरंग स्वप्नीच्या : २१ भाग
१०) श्री हेमंत सांबरे, पुणे यांची “सावरकर समजून घेताना” : ५ भाग
११) प्रा डॉ विजया राऊत ,नागपूर यांची “महानुभावांचे मराठी योगदान” :२५ भाग
१२) अमेरिका स्थित तनुजा प्रधान यांची भावलेली गाणी : १२ भाग
१३) तृप्ती काळे, नागपूर यांची “महामारी आणि विश्वाचा नवोदय” : १५ भाग
१४) श्री प्रवीण देशमुख, कल्याण : “वर्धा साहित्य संमेलन”: १२ भाग.
सध्याच्या लेखमाला
१) श्री विकास भावे, ठाणे: ओठावरली गाणी: ८९ भाग
२) कुमारी समृद्धी विभुते ब्राझिल : ब्राझिल डायरी
३) क्षमा प्रफुल, नवी दिल्ली : “सहज सुचलं म्हणून”
४) प्रकाश चांदे, डोंबिवली : अवती भवती
५) प्रा डॉ शार्दुल वैद्य, मुंबई: आयुर्वेद उवाच
६) प्रिया मोडक, ठाणे : राग सुरभी
७) निवृत्त माहिती संचालक सुधाकर तोरणे, नाशिक :
मी वाचलेले पुस्तक
८) प्रतिभा चांदूरकर,ठाणे : “अमेरिका : माझ्या दृष्टीकोनातून”
नियमित सदरं
१) पुस्तक परिचय
२) पर्यटन
३) हलकं फुलकं
४) चित्रसफर
५) आठवणीतील व्यक्ती
६) दिन विशेष
७) यश कथा
८) संस्था परिचय
९) कविता, गझल, चाराक्षरी
प्रकाशित विशेषांक
१) डॉक्टर म्हणजे देव
२) आषाढी एकादशी
३) स्वातंत्र्य दिन
४) डॉ बाबासाहेब आंबेडकर: ३
४) सिंधुताई सकपाळ
५) डॉ अनिल अवचट
६) लता मंगेशकर
७) मराठी भाषा
८) महात्मा फुले
९) सुरेश भट
१०) तंबाखू विरोधी दिन
११) बालदिन
१२) संविधान दिन
१३) पर्यावरण
१४) गुरू पौर्णिमा
प्रकाशने
न्यूज स्टोरी टुडे पोर्टलवर प्रकाशित झालेल्या लेख माला पुढील पुस्तकात रूपांतरित झाल्या आहेत.
१) समाजभूषण.
लेखक : देवेंद्र भुजबळ. भरारी प्रकाशन, मुंबई
२) मराठी साता समुद्रापार.
लेखिका : मेघना साने. ग्रंथाली प्रकाशन,मुंबई
३) जीवन प्रवास
लेखिका : सौ वर्षा महेंद्र भाबल
न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स. नवी मुंबई
४) मी, पोलीस अधिकारी
लेखिका : सुनीता नाशिककर
न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स. नवी मुंबई
५) समाजभूषण २
लेखिका : रश्मी हेडे
न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स. नवी मुंबई
स्नेहमिलन
न्यूज स्टोरी टुडे पोर्टल चे लेखक, कवी, अन्य सर्व संबधित यांचे अनौपचारिक स्नेह मिलन हा एक आगळा वेगळा उपक्रम आहे.
आता पर्यंत संगमनेर, नाशिक, पुणे, विरार, नवी मुंबई, सातारा येथे स्नेह मिलन आयोजित झाले आहे.
असे हे अनोखे वेबपोर्टल आफ्टरनून, फ्री प्रेस जर्नल, डी एन ए (झी मीडिया), एशिएन एज (डेक्कन क्रोनिकल) या मुंबईतील प्रतिष्ठित इंग्रजी वर्तमान पत्रांमध्ये व काही काळ ‘टिव्ही-9’ आदी ठिकाणी पत्रकार, सिनिअर कोरोस्पॉडंट म्हणून आपल्या पत्रकारितेचा ठसा उमटवलेल्या देवश्री भुजबळ यांनी
कोरोनाच्या भयंकर काळात लोकांना धीर मिळावा, दिलासा मिळावा, योग्य माहिती मिळावी या साठी काळाची पावले व डिजिटल पत्रकारितेचे महत्व ओळखून २२ जुलै २०२० पासून सुरू केले. यासाठी तिने या माध्यमाचे स्वतः प्रशिक्षण घेतले.
निवृत्त माहिती संचालक तथा माजी दूरदर्शन निर्माते देवेंद्र भुजबळ हे या वेबपोर्टलचे संपादन तर त्यांच्या सहचारिणी सौ अलका भुजबळ या पोर्टलची निर्मिती करीत असतात.
अप्रतिम मीडिया संस्थेतर्फे जनमत घेऊन देण्यात येणारा विकास पत्रकारितेतील अत्यंत मानाचा असणारा राज्यस्तरीय “चौथास्तंभ पुरस्कार” मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते एका शानदार सोहळ्यात ‘न्यूज स्टोरी टुडे’ ला पत्रकार दिनी प्रदान करण्यात आला. तर दुसरा एकता पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार यांच्या हस्ते साहित्य संघ मंदिर, गिरगाव येथे प्रदान करण्यात आला.
तर सौ अलका भुजबळ यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार, ठाणे येथे तर माणुसकी गौरव पुरस्कार नाशिक येथे नुकताच प्रदान करण्यात आला.
या पोर्टलच्या यशाविषयी बोलताना श्री देवेंद्र भुजबळ म्हणतात, “या पोर्टलला मिळालेले हे यश म्हणजे सर्व लेखक, कवी, विविध कारणांनी वेबपोर्टल शी जोडल्या गेलेल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचे जणू प्रतीकच आहे” .
देवेंद्र भुजबळ : परिचय
श्री देवेंद्र भुजबळ हे पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र विभागात, बी.सी. जे. (बॅचलर इन कॉमनिकेशन अँड जर्नलिजम) करताना प्रा.ल ना गोखले पाठ्यवृत्तीचे ते सर्व प्रथम मानकरी ठरले. तर मराठवाडा विद्यापीठाच्या ‘एम.एम.सी.जे. (Master in mass communication & journalisuam) अभ्यासक्रमात ते विद्यापीठात, प्रथम श्रेणीत सर्व प्रथम आले.
श्री भुजबळ पत्रकार, भारत सरकारच्या मुंबई दूरदर्शनमध्ये निर्माता, महाराष्ट्र शासनाच्या माहिती खात्यात अधिकारी होते. माहिती संचालक म्हणून ते २०१८ साली निवृत्त झाले.
दूरदर्शनच्या गाजलेल्या “महाचर्चा” कार्यक्रमाच्या २०० भागांसाठी ते ४ वर्षे रिसर्च अँड रिसोर्स पर्सन तर आकाशवाणी वरील महाराष्ट्र शासनाच्या “दिलखुलास” कार्यक्रमाच्या पहिल्या ५०० भागांचे टीमलीडर होते.
श्री भुजबळ यांची पुढील पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
१) भावलेली व्यक्तिमत्वे
२) स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता
(मराठी व इंग्रजी)
३) अभिमानाची लेणी (ई -पुस्तक)
४) गगनभरारी
५) प्रेरणेचे प्रवासी
६) समाजभूषण
७) करिअरच्या नव्या दिशा
श्री भुजबळ यांचे ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे झालेल्या चौथ्या विश्व सावरकर साहित्य संमेलनात “स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता” या विषयावर झालेले व्याख्यान विशेष गाजले.
मलेशियातील “चौथ्या विश्व शब्द” साहित्य संमेलनाचे ते उद्घाटक होते.
विविध विषयांवर ते सातत्याने लिहित असतात. तसेच व्याख्याने देत असतात.
श्री भुजबळ यांना आतापर्यंत विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
– टीम एनएसटी. ☎️ +919869484800
अभिनंदन…अभिनंदन ..अभिनंदन..
.
नमस्कार मंडळी.
आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया वाचून खूप भारावून गेलो. त्याच बरोबर जबाबदारीची जाणीवही झाली.असो. हा सन्मान माझा व्यक्तिगत सन्मान नसून आपल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून तो मिळाला आहे आणि आपला प्रतिनिधी म्हणून मी तो स्वीकारला आहे,अशीच माझी भावना आहे.या पुढेही आपण सर्व अधिक जोमाने कार्यरत राहून,हे जग अधिक सुंदर,सुखी करण्याचा प्रयत्न करू या.
ज्येष्ठ साहित्यिक भुजबळ सरांचे मनापासून अभिनंदन 🌹💐💐🎉🙏🙏
माननीय श्री.देवेंद्र भुजबळ सरांना मराठी भाषा दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा!
आपल्या वेब पोर्टलचा मला सार्थ अभिमान आहे.
आपल्या या उपक्रमामुळे जगभरातील माणसे जोडली गेली आहेत.जगभरातील घडामोडी आम्हाला कळत आहेत आणि आम्हा उत्साही लेखकांना लेखनासाठी प्रोत्साहन मिळत आहे.आपण आणि अलकाताई हे काम मनापासून करता . आपला अनेक वर्षांचा अनुभव आणि या क्षेत्रातील कौशल्य यामुळे वेब पोर्टल ची प्रगती होत आहे.
मी आता ऑस्ट्रेलिया येथे कार्यक्रमासाठी आले आहे. पण येथेही हा अंक वाचता येतोय म्हणून बरे वाटले.
आपला सत्कार झाल्याबद्दल अभिनंदन!
भुजबळ सर, आपला सत्कार करून आपल्या चौथ्या स्तंभाची विशेष दखल घेतली हे आम्हालाही भूषणावह आहे कारण माझ्याप्रमाणेच आणखीही बऱ्याच हातांना लिहितं होण्याची आपण प्रेरणा दिली आहे…. तुमच्याप्रमाणेच अलकाताईंचंही अभिनंदन आणि शुभेच्छा 💐💐
सत्कारमूर्ती श्री देवेंद्रजी भुजबळ साहेब आपले हार्दिक अभिनंदन 🌹
🙏
Congratulations Devendra!
हार्दिक अभिनंदन सर
भुजबळसर, आपला सत्कार झाला ही योग्य गोष्ट आहे. सकारात्मक पसरवण्याचे आपले ध्येय असेच चालू राहो ही मनापासून शुभेच्छा देते.
प्रतिभा सराफ