वारकऱ्यांच्या गर्दीत
दंगते मायबोली मराठी
दऱ्याखोऱ्यातूनी वाहते
आपली मायबोली मराठी
तलवारीत मावळ्यांच्या
गर्जते मायबोली मराठी
तिलक होऊनी शिवबांचा
शोभते मायबोली मराठी
पदर घेऊनी नऊवारीचा
मान राखते मायबोली मराठी
तार नक्षीदार मोरपंखीचे
जोडते मायबोली मराठी
ज्ञानदेवाच्या ज्ञानेश्वरीतून
बोलते मायबोली मराठी
टाळ-मृदंगांच्या तालावरती
होऊनी तुका नाचते मायबोली मराठी
पहिले द्वार शिक्षणाचे
उघडते मायबोली मराठी
अनमोल वारसा संस्कृतीचा
जपते मायबोली मराठी
अशी ही अनमोल मराठी
मिळूनी सर्वजण जपू या
ओळख आपल्या मायबोलीची
जगास साऱ्या देऊ या

– रचना : पुनम सुलाने
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
बहोत बहोत बडीया भाभीसा💐💐☝🏻☝🏻🙏🏻