जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी असतो. पण या दिवसानिमित्त फक्त त्याच दिवशी कार्यक्रम होतात असे नाही तर, पुढेही किती तरी दिवस ते होत असतात.
या दिवसाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे, कल्पक कार्यक्रम होत असतात, हे विशेष.
संगमनेर येथील अभिनव नगर भागातील महिलांनी आपल्या नगराच्या नावाला जागत नुकताच महिला दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमातून राष्ट्रीय एकात्मतेचे महत्व सांगणारा अभिनव कार्यक्रम महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केला.
या कार्यक्रमामध्ये एक अनोखी स्पर्धा घेण्यात आली. त्या साठी महिलांचे महाराष्ट्र, गोवा, राजस्थान, पंजाब आणि दक्षिण भारत असे 5 ग्रुप केले. ज्या ग्रुपला जो प्रांत दिलेला आहे, त्यांनी त्या त्या प्रांतातील सण, नृत्य, पेहराव, रितीरिवाज, खाद्य संस्कृती असे विविधांगी दर्शन घडविणे अपेक्षित होते.
अशा या रंगतदार स्पर्धेत पंजाब ग्रुप ने प्रथम क्रमांक पटकावला. या ग्रुप मध्ये सौ राणी भुजबळ, सौ शिल्पा पंजाबी, सौ भारती कडलग, सौ दिपका काळे, सौ रेणुका पंजाबी, सौ वज्रेश्वरी तावरेज, सौ निशा मिलाणी, सौ संगीता दास्ताने यांचा सहभाग होता.
सर्व स्पर्धेत मिळून जवळपास शंभर महिला सहभागी झाल्या होत्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकारिणी सदस्या
सौ जयश्री काटकर व सौ योगिता पवार यांचे विशेष सहकार्य लाभले.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
Khup khup Chan