Wednesday, September 17, 2025
Homeबातम्यागुरुकृपा : अभिनव वर्धापनदिन

गुरुकृपा : अभिनव वर्धापनदिन

पुणे येथील गुरुकृपा संस्था ही नोंदणीकृत संस्था असून १९९४ पासून विविध क्षेत्रांमध्ये सातत्याने कार्यरत आहे.

गुरुकृपा संस्थेने नुकतेच तिसाव्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्ताने कायम स्वरुपी जायबंदी झालेल्या जवानांचे पुनर्वसन केंद्र असलेल्या खडकी येथील पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटर मध्ये तेथील जवानांसोबत गुरुकृपा संस्थेचे अध्यक्ष पंकजनाथ महाराज यांच्या प्रेरणेने ‘हिम्मत का तराना’ हा गाण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.

यावेळी संजय मरळ, सुनीता चौधरी, अनुपम बॅनर्जी, मुकुंद पारनेरकर, राजेंद्र दूर्णे, हवालदार लांबा, सेलर सुदाम, लक्ष्मी भार्गव आणि कर्नल डॉ. रतनकुमार मुखर्जी यांनी अप्रतिम गाणी गायली.

याच कार्यक्रमात अनिता घाटणेकर, डॉ. सुभाष कोकणे, अनिता देवकर, महारुद्र धुमाळ यांना सेवारत्न पुरस्कार, रश्मी देशमुख यांना कलारत्न पुरस्कार आणि संजय मरळ, सुनीता चौधरी यांना गानरत्न पुरस्कार देण्यात आले.

डॉ. अश्विनी घोरपडे, डॉ. महेंद्र घागरे यांनी गुरुकृपा संस्थेच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सूत्रसंचालन प्रशान्त थोरात यांनी केले, तर निवेदनाचा भार सुजाता चौहान आणि डॉ. गायत्री सावंत यांनी उचलला.

डॉ. दीपा खिस्ती, अपर्णा डिके, श्रीदूल घोगरे, विलास बावधाने आणि प्रतीक्षा शेजवळ यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अपार मेहनत घेतली.

विश्राम कुलकर्णी यांनी नियोजन व छायाचित्रण केले. अनुपम बॅनर्जी यांची ध्वनिव्यवस्था होती.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओ स्टेशनच्या वतीने महेश जगताप यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण केले. ले. कर्नल बाबू लाल भार्गव व त्यांच्या सहकाऱ्यांनी चांगलीच मदत केली.‌

श्रोत्यांमध्ये कमांडर रवींद्र पाठक, ॲड. नीलिमा मैसूर, प्रतिभा भिडे, किशोर इंगुळकर, सुवर्णा घागरे, राजश्री शेंडे अशी अनेक मंडळी होती.

सर्व प्रेक्षकांनी, विशेषतः जवानांनी या कार्यक्रमातून खूप सारा आनंद लुटला. कर्नल डॉ. रतन कुमार मुखर्जी यांनी सर्वांचेच कौतुक करून गुरुकृपा संस्थेच्या ‘सैनिक नागरिक दोस्ती अभियान’ या उपक्रमाची प्रशंसा केली.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. आपल्या गुरुकृपा संस्थेच्या ‘सैनिक नागरिक दोस्ती अभियान’या उपक्रमाची आणि’ हिम्मत का तराना’ या गाण्यांच्या कार्यक्रमाची वेळोवेळी दखल घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद, अलकाताई आणि देवेंद्र साहेब…!!😊🙏
    … प्रशान्त थोरात,
    पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.
    9921447007

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं