Friday, December 19, 2025
Homeबातम्यासाहित्यिकांनी सामाजिक भान जपावे - प्रा.डॉ.अलका नाईक

साहित्यिकांनी सामाजिक भान जपावे – प्रा.डॉ.अलका नाईक

साहित्यिकांनी केवळ मनोरंजनपर लेखन करू नये तर समाजोपयोगी लेखन करावे असे आवाहन प्रा डॉक्टर अलका नाईक यांनी नुकतेच केले. त्या कवयित्री सौ. सुलभा चव्हाण लिखित ‘मनोमनी’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळयात उद्घाटक म्हणून बोलत होत्या.

समारंभाच्या अध्यक्षपदी कवी, वादळकार प्रा.राजेंद्र सोनावणे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.वामन नाखले, विभागीय संचालक मुंबई, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ तर विशेष अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री सौ.विद्या ठाकूर यांची या प्रसंगी उपस्थिती होती.

डॉ नाईक यांनी आपल्या भाषणात “मनोमनी” काव्यसंग्रहातील काव्यरचनांवर सुंदर भाष्य करता करताच अवयव दानाचेही महत्त्व श्रोत्यांना समजावून दिले.

प्रा.राजेंद्र सोनावणे यांनी आपल्या खुसखुशीत भाषणात कवींच्या कथा-व्यथा मांडत खास कवींसाठी व्यासपीठ मिळणे किती गरजेचे आहे हे सांगतले व त्यासाठी नक्षत्रांचं देणं काव्यमंचकडून सर्व प्रकारच्या मदतीची ग्वाहीसुद्धा दिली.

डॉ.वामन नाखले यांनी जाणकार शब्दात साहित्यावर आपले विचार मांडले.

सौ.विद्या ठाकूर यांनी भरभरून शुभेच्छा देत अशा प्रकारच्या कुठल्याही कार्यक्रमासाठी सदैव मदतीचे आश्वासन दिले.

त्यानंतर निमंत्रित कवींचे छोटेखानी काव्यसंमेलन झाले. डॉ. अलका नाईक, सौ.अलका वठारकर, सौ‌.ज्योती कुलकर्णी, सौ.वीणा सामंत, श्री.शेखर चमनकर, सौ.रुपाली चेऊलकर, सौ.नेहा आठवले, श्री.मनोहर वठारकर यांनी स्वरचित कवितांबरोबरच “मनोमनी” मधील कवितांचेही सादरीकरण केले.
कवयित्री सौ. पूजा काळे, सौ. श्रद्धा पाटील यांनीही आपल्या स्वरचित काव्यरचना सादर केल्या.

“मनोमनी” काव्यसंग्रहातील पंडित विरेन सामंत यांनी संगीतबद्ध केलेली एक रचना सौ.सपना आपटे यांनी सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

सौ.सुलभा चव्हाण यांनी आपल्या मनोगतात “मनोमनी”ची वाटचाल विषद करत निवडक रचनांचे सादरीकरण केले व त्यासाठी पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे मन:पूर्वक आभार मानले.

सौ.प्रतिमा भगत यांनी कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन केले.सर्व आमंत्रित पाहुण्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. सर्व उपस्थितांना नक्षत्राचं देणं काव्यमंच तर्फे प्रशस्तीपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजक श्री.सुभाष चव्हाण यांनी सर्व अतिथी व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

चहापानानंतर कार्यक्रमाच्या शेवटी पाहुण्या़च्या हस्ते तुळशीच्या रोपाला अभिसिंचन केले गेले व सर्व उपस्थितांनी म्हटलेल्या पसायदानाने अत्यंत प्रसन्न वातावरणात या प्रकाशन समारंभाचा समारोप झाला.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ.मृदुला राजे on माहितीतील आठवणी : 37
सौ.मृदुला राजे on चित्र सफर : 58
गोविंद पाटील सर on बहिणाबाईं…