Thursday, December 18, 2025
Homeसाहित्यरमजान मास

रमजान मास

भरभराटीचे उधळण करीत
आला महिना मर्म भावनांचा
असा हा पवित्र रमजान मास
मुस्लिम बांधवांच्या आनंदाचा //१//

पाच कर्तव्यामधीलच आहेत
नमाज, रोजा अन् जकात
मुस्लिम अनुयायी त्या अल्लाहचे
यांचे मनापासून पालन करतात //२//

राहून दिवसभर उपवास
अन्न जलाला देतो त्यागून
महिनाभर करतो उपासना
अल्लाहचे आभार मानून //३//

अन्नजलाबरोबर करतो तो
आळा मनाला इंद्रियांना
भोगवस्तूंचा विचार सोडून
मदत करतो गोरगरिबांना //४//

मुस्लीमांचे प्रेषित मुहम्मद
यांचा मुसलमान वसा धरतो
पुण्य लाभते याला नेहमी
गरिबांना दानधर्म करतो //५//

घेऊन दर्शन सायंकाळी चंद्राचे
ईदच्या शुभेच्छा देवून सर्वांना
असोत मित्र वा असोत शत्रू
गळाभेट घेता होते आनंदी सांगता //६//

परवीन कौसर

– रचना : परवीन कौसर. बेंगलोर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ.मृदुला राजे on माहितीतील आठवणी : 37
सौ.मृदुला राजे on चित्र सफर : 58
गोविंद पाटील सर on बहिणाबाईं…
सौ.मृदुला राजे on धुक्याची चादर