मैय्या च्या तीरावर गरीबी नाही समृध्दी आहे. ज्यांने एकवेळ मैय्या वर प्रेम केलं मैय्या त्याला भरभरून देते.
आज आम्हाला रोहिणी तिर्थांचे दर्शन करायचे होते. तिथे एकमुखी दत्त मंदिर आहे. परंतु पाण्याची पातळी वाढली असल्या कारणाने आम्ही मंदिराचे दर्शन करू शकलो नाही. त्या मंदिराचे पौराणिक महत्त्व आम्हाला पंडित अनयजी रेवाशिष यांनी सांगितले.
एक नावाड्याची मुलगी (केवट बाला) जी मैय्या ची भक्त होती तिने भगवान शंकराची तपश्चर्या केली. शंकर भगवान व पार्वती माता प्रसन्न झाली आणि तिला आपल्या मैत्रिणींत सहभागी करुन घेतले आणि तिचे नाव ठेवले कुरकुरी (हरतालिकेच्या पूजेत तिचा उल्लेख येतो). मग ती तीरावर आली आणि पुन्हा तपश्चर्या केली. त्यावेळी पार्वती मातेने आशिर्वाद दिला आणि पुढील जन्मी दक्ष प्रजापती ची कन्या म्हणजे 27 (नक्षत्र) त्यामधील एक जिचे नाव होते “रोहिणी”.
दक्ष प्रजापतींच्या सर्व कन्यांचा विवाह चंद्राशी झाला. चंद्राचे रोहिणी वर अधिक प्रेम होते. त्या कारणाने बाकी 26 कन्या आपलं दुःख सांगायला आपल्या पित्याकडे म्हणजे दक्ष प्रजापती कडे आल्या. दक्ष प्रजापती ने आपल्या 26 कन्यांसाठी एक यज्ञ केला आणि चंद्राला शाप दिला, “जा तुझा राजक्षय होईल.” आणि चंद्राचे स्वास्थ्य बिघडत गेले तो क्षत क्षत होत गेला. त्यावेळी रोहिणी ह्या घाटावर आली आणि नर्मदा मैय्या ला म्हणाली, “मैय्या माझे पती खुप कष्ट सहन करत आहेत, मला कोणी आसरा नाही.”
तेव्हा नर्मदा मैय्या ने सांगितले,
“माझ्या तीरावर जो कोणी तपश्चर्या करेल त्यांचे सगळे रोग दूर होतील. नंतर चंद्र देव तीरावर आले मैय्या चा आशिर्वाद मिळवला आणि रोग मुक्त झाले. रोगातून सुटका झाली परंतु प्रकाश प्राप्त झाला नाही. नंतर चंद्र देवाने भोलेनाथाची तपश्चर्या केली त्यावेळी भोलेनाथाने एक स्थान सांगितले ते स्थान होते, “सौराष्ट्र सोमनाथ” जे प्रथम ज्योतिर्लिंग आहे. (आई अहिल्याबाई होळकर आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचे प्रचंड उपकार आहेत ज्यांनी ह्या स्थानाला पुन्प्रस्थापित केल) सोरटी सोमनाथ तिथून दक्षिण ध्रुव पर्यंत एकही भुमी चा तुकडा नाही (बघा सर्वात मोठे वैज्ञानिक तर आपले भोलेनाथ आहेत) त्या भुमीवर चंद्र देवाला प्रकाश प्राप्त झाला. सोरटी सोमनाथ चे शिवलिंग चंद्र देवाने स्थापित केले.
आपल्या तिर्थ परंपरेत विज्ञान आहे. आपला सनातन धर्म पूर्ण पुणे विज्ञानावर आधारित आहे. विश्वात जितके पण आविष्कार झाले त्यांचा आधार वेद पुराण आहेत. इथे दूरुनच दर्शन करुन आम्ही निघालो.
आम्हाला आता जायचे होते मध्य प्रदेश आणि गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील प्रतिकाशी इथे. हे साधारण अंतर होते 150 कि.मी. इथे आम्ही उशिरा पोहचलो. हे क्षेत्र तापी, पुलंदा आणि गोमाई नदीच्या संगमावर आहे. ह्या तीर्थक्षेत्रा बद्दल असं बोललं जातं धर्म ग्रंथांच्या आधारे देवतांचे दक्षिणायन म्हणजे रात्र सहा महिने आणि उत्तरायण म्हणजे दिवस सहा महिने असतात. भगवान शंकराने सांगितले की जो व्यक्ती दक्षिणायना मध्ये 108 शिवालय बनवेल तो ज्ञानाचे केंद्र म्हणून ओळखला जाईल. वारणा आणि असी नदीच्या काठावर एकशे सात शिवालय बनले गेले आणि सुर्याची किरणे पडली. प्रकाश पडल्यामुळे हे स्थान प्रकाशा म्हणून प्रसिद्ध झाले. आणि काशी मध्ये भगवान शंकर प्रसन्न झाले आणि म्हणाले तो पर्यंत काशी चे दर्शन पूर्ण होत नाहीत जो पर्यंत दक्षिण काशी चे दर्शन करत नाही. काशी यात्रेनंतर इथे येऊन उत्तर पूजा केली की काशी यात्रेचे पुण्य मिळते. मंदिराच्या गर्भगृहात काळ्या पाषाणातील भव्य शिवलिंग तथा नंदी आहे. केदारेश्वर मंदिरा समोर पाषाणातील भव्य दीपस्तंभ आहे. एक वेळ प्रकाशा ची यात्रा केली की शंभर वेळा काशी यात्रा झाली अशी मान्यता आहे.
तापी नदीच्या काठावर वसलेली ही सर्व मंदिरे पाषाण निर्मित हेमाडपंथी आहेत. इथे असलेल्या पुष्पदंतेश्वर मंदिराचे एक वेगळेच महत्व आहे. हे मंदिर तीर्थक्षेत्र काशी मध्ये स्थापन करण्यात आले नाही. त्या क्षेत्रात रथ उद्यान होते त्यामध्ये सुंदर तळं होतं. जे महाराज चित्ररथ यांनी बनवले होते त्यामध्ये करोडो कमळ फूलं उगवायची. गंधर्व राज पुष्पदंत इथे आला आणि बोलला,
“माझी सारी व्यवस्था आहे आता मी आरामात माझे संकल्प पूर्ण करु शकतो”. परंतु उद्यानाची सुरक्षा व्यवस्था खूपच चोख होती. परवानगी शिवाय कोणीही उद्यानात येऊन एकही फूलं तोडू शकत नव्हते. गंधर्व राज पुष्पदंताला अदृश्य होण्याची कला अवगत होती. तो गुप्त स्वरुपात येऊन दर दिवशी कमळ फूलं तोडून नेत असे. महाराज चित्ररथ हैराण झाले. माझ्या बागेतील कमळ फूलं कोण तोडते ? सुरक्षा व्यवस्था तर कडक होती. मग संशय आला की जरुर कोणी गुप्त स्वरुपात येऊन फूलं तोडून नेत असावं. नाहितर हे असंभव आहे. संपूर्ण उद्यानाच्या मार्गावर शिवनिर्माल्य टाकून ठेवलं. पुष्पदंत आला पण त्याच्या लक्षात आलं नाही. चूकुन त्याचा पाय शिव निर्माल्यावर पडला. त्यामुळे गंधर्वराज पुष्पदंताची गुप्त होण्याची कला लुप्त झाली. निस्तेज झालेल्या पुष्पदंताला सुरक्षा रक्षकांनी बंदी बनवले. त्यावेळी शिवशंकराची क्षमा प्रार्थना मागताना जे शब्द त्याच्या ह्रदयातून निघाले ते “शिवमहिम्नस्तोत्र”. त्या स्थळाचे नाव आहे सुक्ष्मदंतेश्वर जिथे शिवमहिम्नस्तोत्राची रचना झाली. म्हणून शिव शंकर प्रसन्न झाले आणि क्षमा केली गंधर्व राज पुष्पदंताला सारी शक्ती परत प्रदान केली.
इथे आमच्या ग्रुप सोबत अजुन एक ग्रुप परिक्रमा करण्यासाठी आला होता. त्यांच्या सोबत सिवनी चे लाडके लड्डू गोपाल होते. त्यांना बघुन प्रत्येकानी त्यांना कडेवर घेतले आणि फोटो काढले. ज्या वेळी त्यांना उचलून घेतले त्यावेळी वाटत होतं की एक छोटंसं बाळं उचललं आहे. उज्जेन सिवनी चे लड्डू गोपाल ला आपण जो प्रसाद अर्पण करु तो ते ग्रहण करतात. त्याला सिवनी चे सरकार बोलले जाते. अश्या सुंदर लड्डू गोपाल चे दर्शन करुन आम्हाला खुप आनंद झाला.
श्री राधे गोविंदा मन भजले हरी का प्यारा नाम है|
गोपाला हरी का प्यारा नाम है
नंदलाला हरी का प्यारा नाम है|
सुंदर दर्शन आणि प्रसन्न मनाने आम्ही दक्षिण काशी वरुन निघालो. आज आमचा प्रथम रात्रीचा प्रवास होता जो शूलपाणी च्या जंगलातून होता. शूलपाणीचे मामा लूटमार करतात असं ऐकलं होतं. ते परिक्रमावासीयांना लूटतात ते गरीबीमुळे नाही तर त्यांना तशी आज्ञा असते. भोलेनाथाला परिक्षा द्यावी लागते. मानवी जिवनाचे अंतिम लक्ष्य मोक्ष आहे. शिव शंकराची कन्या नर्मदा आणि रुद्रगण शिव शंकराचे पुत्र. नर्मदा आमची मैय्या (आई) मग आई चा भाऊ म्हणजे मामा म्हणून त्यांना मामा म्हणतात.
शूलपाणी चे जंगल हे तीन महाराक्षसांची तपोभूमी आहे त्यांचा प्रभाव असणारच. ते आहेत रावण, मेघनाद आणि हिरण्याक्ष. मेघनाद जांगरवा वरुन शिवलिंग घेऊन श्रीलंकेला जात होता. मैय्याने चुटकी वाजवली आणि शिवलिंग पाण्यात पडले जे त्याला तपश्चर्येने प्राप्त झाले होते. नंतर त्याला एक शिवलिंग दिले ते मैय्या च्या मधोमध आहे ते आहे “मेघनारेश्वर” 2018 मध्ये त्याचं दर्शन झालं होतं. आमच्या पंडित अनयजी ने त्या वेळी दर्शनाचा लाभ घेतला होता.
श्रीलंका ही रावणाला तपश्चर्येने प्राप्त झाले होते ते होते विजासन. बिजवासीनी शक्ती गर्भाचे शोषण करते. म्हणून वर दिला ज्यांना गर्भपाताची समस्या असेल त्यांची समस्या तिथे जाऊन दूर होते. हिरण्याक्ष ज्याने पृथ्वी चे हरण केले आणि पृथ्वी रसातळाला घेऊन गेला. नंतर पृथ्वी ला तिथून काढण्यासाठी परमेश्वराला वराह अवतार घ्यावा लागला.
मोरकट्टक इथे हिरण्याक्षाने तपश्चर्या केली तिथे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जत्रा भरते.तेथील पाषाणावर तीव्र प्रकाश पडतो. केशर प्रकाश येत होता ते स्थान आता पाण्याखाली गेले. शूलपाणेश्वर बाबा पाण्यात विसर्जित झाले. हे आपले पुराण आहे पुरा-नव जे पुराणं असुनही नवीन वाटतं.
आज इथे आपली आज्ञा घेते. पुन्हा भेटू.
“काल हर दुःख हर दारिद्र्य हर संताप हर क्लेश हर मॉं सबका भला कर
नर्मदे हर जिंदगी भर”
क्रमशः

– लेखन : सुलभा दिवाकर
– संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800