देशातील सर्वात स्वच्छ व सुंदर हिलस्टेशन म्हणून महाबळेश्वर नावारूपाला आणण्यासाठी हिलदारी अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून आजच्या जागतिक वसुंधरा दिनाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत मेटगुताड यांच्या सहकार्याने गावात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिलदारीचे प्रकल्प व्यवस्थापक डॉ. मुकेश कुळकर्णी यांनी केले. जागतिक वसुंधरा दिनाचे महत्व समजावून सांगत त्यांनी आपण या वसुंधरेवर वास्तव्य करत आहोत, या वसुंधरेला स्वच्छ, सुंदर व प्रदूषणमुक्त ठेवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे व त्याचाच एक भाग म्हणून आपल्या गावामध्ये स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले आहे. सदरील स्वच्छता मोहिमेतून प्लास्टिक बॉटल, काचेच्या बॉटल, मिक्स प्लास्टिक, कापड, पुठ्ठा, कागद, चिप्स व बिस्कीट चे पॉकेट इत्यादी सर्व प्रकारचा कचरा हा वेगवेगळा संकलित करण्याबाबत सूचना व माहिती दिली.
या स्वच्छता मोहीमेची सुरुवात ग्रामपंचायत मेटगुताड उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक हॉटेल्स, हिलदारी टीम व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत माझी वसुंधरा अभियानाची शपथ घेवून करण्यात आली.
या मोहिमे दरम्यान जिंजर कॅफे ते हॉटेल जे.के. पर्यतच्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूने पडलेला सुका कचरा गोळा करण्यात आला.
एकूण प्लास्टिक बॉटल (१५.५ किग्र), काचेच्या बॉटल (१२.३ किग्र), मिक्स प्लास्टिक (११.६ किग्र), कापड (४.३ किग्र), व इतर कचरा(१.८ किग्र) इत्यादी प्रकारचा एकूण ४५.५ किलोग्रॅम कचरा गोळा करण्यात आला.
मोहिमेदरम्यान सर्व सहभागींनी स्थानिक हॉटेल्स व घरगुती भागधारकांना आसपासचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा आग्रह करत सुचना दिल्या.
ही मोहिम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत मेटगुताडचे उपसरपंच श्री. महादेव ओंबळे यांचे मार्गदर्शन लाभले. ग्रामपंचायत सदस्य श्री. भिकन बावळेकर, श्री. दीपक बावळेकर, मोहन बावळेकर, दत्तू बावळेकर, ग्रामपंचायत कर्मचारी श्री. महेश बावळेकर, श्री. राजेंद्र कोंडाळकर, हॉटेल टी.जी.एल, हॉटेल मलबेरी चे कर्मचारी व हॉटेल साज महिंद्रा, ग्रामस्थ मेतगुताड, हिलदारी टीम अश्या एकूण ४६ लोकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
ही स्वच्छता मोहीम यशस्वी रित्या पार पडण्यासाठी हिलदारी चे प्रकल्प व्यवस्थापक स्वतः डॉ. मुकेश कुळकर्णी, राम भोसले, प्रतिमा बोडरे, निशांत कदम, खाकसरअली पटेल, फैयाज वारुणकर, अमृता जाधव, आर्तीका मोरे, सुरज मोरे व अनुराग खरे इत्यादिनी परिश्रम घेतले.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800