पडावं कधीतरी
स्वतः स्वतःच्या प्रेमात
शोधावं कधीतरी
आपलं अस्तित्व आपल्याच मनात
तोडावं कधीतरी
नातं व्यर्थ विचारांशी
बोलावं कधीतरी
आपणच आपल्या स्वप्नांशी
पहावं एकटक कधीतरी
आकाशातील चंद्राला
व्हावं नतमस्तक कधीतरी
पाहून मावळतीच्या सूर्याला
शिकावं कधीतरी
मनसोक्त जगायला
राहून काट्यातही
फुलासारखं उमलायला
चालावं कधीतरी
अनोळखी वाटेवरती
थांबावं कधीतरी
वाट पाहणाऱ्या किनाऱ्यावरती

– रचना : पूनम सुलाने
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800