Monday, July 14, 2025
Homeबातम्यादेवेंद्र भुजबळ जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

देवेंद्र भुजबळ जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

वृतपत्रकारिता, दूरदर्शन, आकाशवाणी, शासकीय जनसंपर्क आणि आता डिजिटल माध्यमात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल माध्यमकर्मी श्री देवेंद्र भुजबळ यांना २ हजार सदस्य असलेल्या, एजेएफसी या पत्रकारांच्या राष्ट्रीय संघटनेकडून जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

हा कार्यक्रम जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ३ मे रोजी मुंबईतील गांधी बुक सेंटर च्या
सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

सत्काराला उत्तर देताना श्री भुजबळ म्हणाले की,
जीवन गौरव पुरस्कार मिळाला म्हणजे, आपले जीवन कार्य संपले असे आपण समजत नसून, या पुरस्काराने
आता अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळेल.

कार्यक्रमाचे अध्यक्ष, मार्मिक चे संपादक श्री मुकेश माचकर यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करून पत्रकारांच्या स्वातंत्र्याला जसा बाह्य धोका असतो, तसाच तो व्यवस्थापनाकडून ही निर्माण होत असतो, याकडे लक्ष वेधले.

निवृत्त माहिती उपसंचालक डॉ संभाजी खराट यांनी वृत्तपत्र स्वातंत्र्य आणि संबंधित बाबींचा सविस्तर उहापोह केला.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल यांनी संघटनेची वाटचाल विशद करून भावी उपक्रमांची माहिती दिली.

एजेएफसी चे अध्यक्ष गणेश कोळी यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचलन पत्रकार ईश्वर हुलवान यांनी केले.

याच कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार बाळ पाटणकर यांच्या
इस्लामी जगत” पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास विविध मान्यवर आणि अनेक पत्रकारांची उपस्थिती होती.

अन्य पुरस्कार प्राप्त व्यक्ती पुढीलप्रमाणे आहेत.
१) आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मृती दर्पण पुरस्कार –
श्री. निलेश पोटे, वृत्तसंपादक दै. दिव्य मराठी, अकोला
२) नानासाहेब जोशी स्मृती संपादक सन्मान पुरस्कार – श्री बाळकृष्ण कासार. संपादक लोकनिर्माण.
३) जेष्ठ पत्रकार नवीन सोष्टे, मराठी पत्रकार सन्मान पुरस्कार – श्री. विठ्ठल मोघे, दै. पुण्यनगरी, दौंड- पुणे
४) जेष्ठ पत्रकार जयानंद मठकर स्मृती आदर्श पत्रकार पुरस्कार – श्री. निसार अली, सकाळ, मुंबई
५) मधुकर लोंढे स्मृती साप्ताहिक संपादक पुरस्कार –
श्री. किरण बाथम. दै. भास्कर.
६) हभप शरद दादा बोरकर स्मृती सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार – रायगड भूषण प्रा. एल. बी. पाटील.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

18 COMMENTS

  1. आपल्याला प्राप्त झालेल्या जीवनगौरव पुरस्कार बाबत मनःपूर्वक खूप खूप अभिनंदन. पत्रकारिता क्षेत्रातील आपल्या कामाची दखल समाजाकडून घेतल्या गेली हे निश्चितच भुषणावह आहे. आपल्या हातून असेच उत्तम उत्तम कार्य सतत होत राहो ही प्रार्थना.

  2. जीवनगौरव पुरस्कारबद्दल आपले अभिनंदन 💐 निच्छितच आपली गेले कित्येक वर्षांची मेहनत आहे. एक द्रष्टा पत्रकार, काळानुरूप माध्यमांचा योग्य वापर आणि दांडगा जनसंम्पर्क हा ह्यापुढील वाटचालीस प्रेरणा देत राहील. माझ्या सदिच्छा 🌷🙏

  3. माननीय श्री देवेंद्र भुजबळ
    आपणांस जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल आपले मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन.💐💐💐
    अशीच आपली पत्रकारिता, प्रोत्साहनपर लेखन सतत चालू रहावी, इतरांना उत्तेजित कार्यप्रवृत्त करणारी व्हावी ह्यासाठी शुभेच्छा.
    …. रविंद्र वेळापुरे व परिवार 💐👏💐

    • 🤝🤝 आभारी आहे. आपले आशीर्वाद हिच सदिच्छा

  4. श्री देवेंद्र भुजबळ साहेब आपणास जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल आपले 🌹हार्दिक अभिनंदन 🌹
    🙏धन्यवाद

    • 🤝🤝 आभारी आहे. आपला आशीर्वाद हिच सदिच्छा

  5. माननीय देवेंद्रजी भुजबळ ,जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. अत्यंत कठीण परिस्थितीत शिक्षण घेऊन पत्रकारितेत प्रवेश, महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागात नोकरी, प्रखर बुद्धिमत्ता, अहोरात्र परिश्रम, ध्येयपूर्तीची जिद्द या गुणांच्या जोरावर संचालक (माहिती व जनसंपर्क विभाग ) या पदावर पदोन्नती. दूरदर्शनवर विविध कार्यक्रम करत असताना ,”माझी माती माझी माणसं” सारखे कार्यक्रम लोकप्रिय झाले.सेवानिवृत्तीनंतरही आंतरराष्ट्रीय न्यूज पोर्टल चालू करून कार्यरत राहिले. वैविध्यपूर्ण विषयांचा समावेश असलेले हे पोर्टल अल्पावधीत लोकप्रिय झाले. कासार समाजातील आदर्श व यशस्वी व्यक्तींचे चरित्र “समाजभूषण” एक व दोनच्या माध्यमातून समाजापुढे आणून युवक युवती साठी एक प्रेरणास्त्रोत निर्माण केला. खऱ्या अर्थाने देवेंद्रजी जीवन गौरव या पुरस्काराचे मानकरी आहेत. देवेंद्रजी आपले हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.

    • 🤝🤝🤝 आभारी आहे आपला आशीर्वाद हिच सदिच्छा

  6. देवेंद्र साहेब,
    जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल
    गुरुकृपा संस्थेच्या सर्व सभासदांच्या वतीने
    मन:पूर्वक अभिनंदन…!!!
    … प्रशान्त थोरात, पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.

    • आभारी आहोत असाच लोभ वृद्धिंगत व्हावा हिच सदिच्छा

  7. मा.श्री.देवेंद्र भुजबळ यांना जीवनगौरव पुरस्कार दिला गेला याबद्दल आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
    त्यांचे कार्यही तसेच मोठे आहे.
    सर खूप खूप अभिनंदन आणि पुढील कामासाठी शुभेच्छा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments