मोगरा फुलला
हसत खुलला
बेधुंद होवून
धवल रंगला
नाजूक निर्मळ
पाडतो भुरळ
मादक मोहक
मधु परिमळ
अवतरे दारी
लेत गंध भारी
मुग्ध करी जणू
रमनीय नारी
अबोध कलिका
उद्याची मल्लिका
स्वप्नील मनास
कृष्णाची शालिका
वेधते अंगणी
मोहक चांदणी
चंद्रही कौतुके
गीत गायी झणी
नाते मोगऱ्याशी
सौख्यदायी राशी
हवेसे बंधन
सदा अविनाशी

– रचना : सौ.मनिषा पाटील. केरळ
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800