वेशीपर्यत आलाच आहेस
चोरपाऊलं का टाकतोय
नको आता वाट बघणं…
आता तू फक्त बरस..
आरतीने तुला ओवाळते.
माप ओलांडायला देते.
आता तू फक्त बरस.
पैसा नाही आता
नाही काही जमा..
शेतात आधी तू बरस
आधी मातीत तूला रुजव
पोराबाळांना जगविण्यासाठी
आधी पिकं तिकडची उगव
संसाराचा गाडा ओढायला
पावसा, बरस रे तू बरस
बरस बरस का एवढी
तुला करावी आळवणी
कुठले पागं फेडतो
कुठून आणू पाणी.
मुलांच्या पोटी आता
कुठला देऊ घास.
दिर्घ तूझी वाट पाहून
धनी ने लावला फास
पोरांसाठी जगावं लागतंय
सहन होत नाही त्रास.

– रचना : पूर्णिमानंद
– संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800