राज्यातील सर्व शासकिय व अभिमत वैद्यकिय महाविद्यालये आणि खाजगी वैद्यकिय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्यासाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या वतीने टोल फ्री.14499 हा क्रमांक “संवाद” या मानसिक आरोग्य विषयक हेल्पलाईन चे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सेवासदन या शासकीय निवासस्थानी काल उद्घाटन करण्यात आले.
सचिव, वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्या दालनात झालेल्या बैठकीमध्ये वैद्यकिय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मानसिकतेविषयी चर्चा करण्यात आली. ज्यामध्ये प्रामुख्याने आत्महत्या या विषयांवर विशेष चर्चा करण्यात आली. यावेळी विभागाच्या सचिव, डॉ अश्विनी जोशी; सहसंचालक वैद्यकीय शिक्षण, अजय चंदनवाले तसेच विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दुरदृष्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्सी द्वारे) विद्यार्थी तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधत़ाना म्हणाले की, बदलती अभ्यास पद्धती वाढता ताण ताण या सर्व गोष्टींचा खेळीमेळीच्या वातावरणात सामना केला पाहिजे तसेच कोणत्याही बदलांना सहजपणे सामोरे जायला हवे.
सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेक गोष्टींमुळे विद्यार्थी मध्ये मोठ्या प्रमाणावर नैराश्य निर्माण होत आहे. यासाठी हा टोल फ्री क्रमांक हेल्पलाईन सारखा उपक्रम नक्कीच फायदेशीर ठरेल असा विश्वासही या प्रसंगी त्यांनी व्यक्त केला.
वैद्यकिय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मानसिकता जाणून घेवून त्यांचे समूपदेशन करणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, त्यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करणे इत्यादी बाबींसाठी त्यांचे करीता “संवाद” मानसिक आरोग्य हेल्पलाईन सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
या सेवा महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, पुणे अंतर्गत पाषाण येथील संकुलामध्ये सुरु करण्यासाठीची मान्यता देण्यात आलेली असून या हेल्पलाईनमध्ये तज्ञ मनुष्यबळामार्फत मानसिक आरोग्याविषयी विद्यार्थ्यांचे समूपदेशन करण्यात येणार आहे. “संवाद” मानसिक आरोग्य हेल्पलाईन 14499 हा टोल फ्री क्रमांक कालपासून सुरु करण्यात आला आहे.

संवाद हेल्पलाईनमधील समोपदेशनामुळे राज्यात आरोग्य क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यात सुधारणा होण्यास मदत होईल. सदर संवाद 14499 या हेल्पलाईनचा लाभ आरोग्य क्षेत्रातील सर्व अध्यापक व विद्यार्थ्यांनी गरजू विद्यार्थ्यापर्यंत पोहचविण्याचे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800
सुंदर उपक्रम.
Very good