Thursday, September 18, 2025
Homeसाहित्यनटखट पावसा

नटखट पावसा

नटखट खोडकर तु कसा !
शाळेच्या वेळेवर येतोस बरा !
मधल्या वेळेत लपतोस कसा ?
निघायच्या वेळेस बरसतोस बरा
!

चिंब होऊन खेळावं फार !
वाटतं मनी वारंवार ,
वाट पाहण्यात सरतो रविवार !
तु मात्र लपतोस ढगापार !

शेतकऱ्याला मात्र भारी छळतोस !
पेरणीच्या अवधीत गायब होतोस !
शेतकरी बापडा हतबल होतो !
राखण म्हणून कोंबडा देतो !

नद्या धरणे आटून जातात ,
विहिरी तर अगदी तळ गाठतात !
मीडियावाले बातम्या धाडतात ,
कमी दाबाने पाणी सोडतात !

सूर्याच्या किरणात बाष्परूप घेतोस ,
काळ्या ढगात सामावून जातोस ,
थंड हवेची वाट पाहतोस ,
मग वेळेत येण्यास का नाकारतोस !

निष्ठूर असा नको होवूस ,
सजीव जीवन तुझ्याच हाती ,
निसर्ग सौंदर्य तूच खुलवतोस !
शेतकऱ्याचा प्राण तुझ्याच हाती !

वर्षा भाबल.

— रचना : सौ. वर्षा महेंद्र भाबल.
— संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. खूपच छान कविता केलीस वर्षा👌👌

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा