Wednesday, September 17, 2025
Homeसंस्कृतीहे विश्व निरागसतेचे

हे विश्व निरागसतेचे

छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण(प) संचलित, नूतन ज्ञान मंदिर , कल्याण (पू) शाळेमध्ये काल दीप आमावस्या मोठ्या उत्साहात साजरी झाली. संस्कारक्षम वय असणाऱ्या लहान विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची, सणावारांची ओळख व्हावी तसेच ते कशा पद्धतीने साजरे केले जातात हे माहित व्हावे यासाठी अशा प्रकारचे सण आणि उत्सव हे लहानग्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत अतिशय उत्स्फूर्तपणे साजरे केले जातात.

प्रत्येकच पालकांच्या घरामध्ये ही दीप अमावास्या साजरी करतातच असे नाही त्यामुळे शाळेत असे सण उत्सव साजरे केले असता लहान मुलांना आनंद तर मिळतोच त्याच बरोबर ते का साजरे केले जातात ही माहिती ही मिळते.
संध्याकाळी देवासमोर दिवा लावून  “शुभं करोति कल्याणम्”  म्हणून घरातील वडीलधार्‍यांना नमस्कार करणे हा संस्कार पिढ्यां पिढ्या चालत आला आहे. आता आधुनिक  जगात वि‍जेच्या दिव्यांचे हजारो प्रकार असतानाही आपण देवासमोर मात्र तेल किंवा तुपाचाच दिवा लावतो. कारण त्याचा सात्विक प्रकाश अंधार दूर करतो आणि नजरेलाही सुखद, पवित्र वाटतो. दिवा मांगल्याचे प्रतिक आहे.

दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या होय. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. या दिवशी, सर्व दिवे चकचकीत करून पाटावर मांडून ठेवावेत. पाटाभोवती सुरेख रांगोळी रेखाटावी, फुलांची आरास करावी.सर्व दिव्यांमध्ये तेल वात घालून प्रज्वलित करावेत. कणकेचे गोड दिवे (उकडलेले) बनवतात. ओल्या मातीचे दिवेही बनवून पूजेत मांडतात. या सर्वांची हळद कुंकू, फुले, अक्षता वाहून मनोभावे पूजा करावी. गोडाचा नैवेद्य दाखवावा. यावेळी खालील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात.
दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस: तेज उत्तमम ।
गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव:॥

हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस, तेजामध्ये उत्तम तेज आहेस. मा‍झ्या पूजेचा स्वीकार कर आणि मा‍झ्या सर्व इच्छा पूर्ण कर. आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्व आहे, प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते. घरातील इडापिडा टाळून, अज्ञान, रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दिप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी हेच आपली संस्कृती सांगते. या लहानग्या विद्यार्थ्यांनी या दिव्यासमोर प्रार्थना, श्लोक आपल्या लडिवाळ अशा आवाजात म्हटले, काहींची म्हणताम्हणता समाधीही लागली. अतिशय निरागसपणे आपल्या बाई कशा नमस्कार करतात ते पाहून नमस्कार करत होते आणि सुंदर आणि पवित्र अशा क्षणांचा आनंद घेत होते.
ज्ञान आणि आपली संस्कृती यांचा संगम साधणाऱ्या मुख्याध्यापिका आणि शिक्षिकांचे वृंद यांचे कौतुकच आहे. प्रत्येक सण इतक्या सुंदर प्रकारे या विद्यार्थ्यांसाठी साजरा करतात की डोळ्याचे पारणे फिटते.

या धकाधकीच्या जीवनात पालकांना हे सर्व सणवार साजरे करणे शक्य होत नाही. त्यामुळे बरेच विद्यार्थी हे या सर्वांपासून अनभिज्ञ असतात. असेच सुरू राहिले तर कालांतराने हे आपले सण-उत्सव रूढी परंपरा या पुढील पिढीला माहित होणार नाहीत परंतु या सर्वजणी आपल्या संस्कृतीचे सणांचे बीज विद्यार्थ्यांच्यात ज्ञानाबरोबर रुजवण्याचे कार्य नूतन ज्ञानमंदिर मधील पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विभाग करत आहे.

आस

— लेखन : आस
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं