Friday, November 22, 2024
Homeपर्यटनमाझं परदेश भ्रमण : 1

माझं परदेश भ्रमण : 1

माझं परदेश भ्रमण….या विषयावर, सौ सुप्रिया प्रशांत सगरे या लिहिणार आहेत. त्या पुणे विद्यापीठाच्या संख्या शास्त्र विषयातील पदवीधर असून त्यांनी कॉम्प्युटर मॅनेजमेंट मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला. लग्नानंतर त्या एका कंपनी साठी फ्रीलांस प्रोग्रामिंग करायच्या. त्यांचे पती फार्मा इंडस्ट्री मध्ये इंटरनॅशनल मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत आहेत.
त्यांना दोन मुले असून मोठा मुलगा स्वीडन देशात Scania कंपनी मध्ये जॉब करतोय. तर धाकटी मुलगी प्रॉडक्ट डिझाईन मध्ये पदवी शिक्षण घेतेय.

पती प्रशांत ह्यांच्या कामा मुळे त्यांना सतत परदेशात भ्रमण करावं लागतं. त्यांना फिरायची आवड असल्याने मूल लहान असताना पण त्यांनी देशात आणि परदेशात खूप कौटुंबिक सहली केल्या. त्यांना बाहेर फिरायला गेल्यावर निरिक्षण करायची सवय लागली. अनेक वेगवेगळे अनुभव आले. ह्या वेळी त्या त्यांच्या दुबई आणि युरोप ट्रीप च्या सगळ्या आठवणी आपल्यासाठी शब्दांकित करीत आहेत.
आशा करते की तुम्हाला सर्वांना त्या वाचायला नक्कीच आवडतील .
सौ सुप्रिया सगरे यांचे “न्यूज स्टोरी टुडे” परिवारात हार्दिक स्वागत आहे.
– संपादक

खूप दिवस झाले, आमच्या महिना भराच्या ट्रिप विषयी लिहायचे मनात होते. शेवटी आज मुहूर्त लागला. आम्ही जेव्हा मोठ्या मुलाकडे स्टॉकहोम, स्वीडन येथे जायचे ठरवले तेव्हा tickets book करायला तसा उशीरच झाला होता. कारण युरोप व्हिसा (schengen) साठी ते गरजेचे होते. म्हणजे व्हिसा प्रोसेस चालू करायला सुद्धा उशीर झाला होता 😅. ठरवले खरं पण त्या प्रमाणे जायला मिळतय की नाही हे व्हिसा हातात मिळाल्या शिवाय नक्की होणार नव्हते.

प्रशांत चा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा अनुभव असल्याने व त्याचा schengen व्हिसा असल्याने फक्त माझा आणि लेकीचा व्हिसा काढायचा होता. लेकानं प्रशांत ला इंटरनॅशनल driving licence काढायला सांगितले. ते काढायला गेला आणि त्याचा पासपोर्ट हरवला 🤦‍♀️. मग माझी आणि लेकीची व्हिसा च्या biometrics chi अपॉइंटमेंट आम्ही 10 मे ठरवलेली ती आता प्रशांत ला पण परत नवीन पासपोर्ट काढून मग घ्यावी लागते की काय आणि आम्ही ठरवलेल्या दिवशी (10 जून) आम्हाला निघायला मिळणार का (कारण tickets तर ब्लॉक केले होते) असा प्रश्न पडला. पण देव कृपेने 5 दिवस अश्या घालमेलीत गेल्यावर प्रशांत चा पासपोर्ट 6 मे ला सापडला 💃💃. (त्याची एक आख्खी वेगळी कथा लिहून होईल 😂)

मग आम्ही biometrics साठी appointments चेक केल्या तर लेटेस्ट 17 मे ची उपलब्ध होती. सर्व कागदपत्रे (लेकाचे invitation letter व राहण्याच्या जागेची व्यवस्था, मेडिकल insurance etc) agent ने सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित लावली होती. तरी त्या biometrics च्या ऑफिस मध्ये त्यांनी एक त्रुटी काढली. आणि उपाय पण सुचवला (जय महाराष्ट्र 😃 कारण काम करणारे बहुतांश मराठी आहेत). मग लगेच लेकाला फोन करून त्याला ते उर्वरीत कागदपत्र ईमेल ने पाठवून त्याची प्रिंट आउट काढून तिथे दुपारी 12 च्या आधी submit केली (हुश्श असे feeling आले 😆)

तसे काही जणां कडून ऐकले होते की फ्लाइट डेट निघून गेली तरी व्हिसा मिळाला नाही, त्यामुळे फ्लाइट ticket चे पैसे वाया गेले. म्हणून व्हिसा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत Swedish Embassy ला ईमेल करावी का (फास्ट प्रोसेसिंग च्या विनंती साठी) ह्या विचारात ईमेल पण ड्राफ्ट करून ठेवली (कारण लेक Swedish Embassy च्या Instagram पोस्ट वर झळकला होता. Embassy नीच त्याला त्यावेळेस contact करून लिहायला सांगितले होते) पण त्या आधीच मला embassy कडून मेसेज अपडेट यायला लागले. त्यामुळे मी जरा निश्चिंत झाले. आणि ईमेल पाठवली नाही. त्यांचे 15 working days असे time limit असते पण आम्हाला 12 दिवसात व्हिसा स्टॅम्प करून पासपोर्ट हातात मिळाले. अजून एकदा हुश्श झाले. 😄 लेका कडे जायचे तर निश्चित झाले.

तोपर्यंत लेकीने पपा कडे टूमने लावल की via दुबई जातोय तर तिथे 3/4 दिवस थांबून जावू यात. मला लहानपणी बघितलेल आता काहीही आठवत नाहीये. लेकीच मन बापाला मोडता येत नाही ! मग काय केली UAE व्हिसा प्रोसेस चालू 😅. तो पण 96 hrs चा व्हिसा आणि त्या प्रमाणे हॉटेल बूकिंग अस 7/8 तारखेला सर्व झाले. (अजून एकदा वेळे वर झाले म्हणुन हुश्श केल 😆😅)

मधल्या काळात पॅकिंग तर चालूच होते. मुलाकडे न्यायचा खाऊ (चिवडा, लाडू, चकली, आंबा बर्फी, गुलाब जाम) आणि अजून बरच काही जस की रेडी to make भाज्यांचे व नाश्त्याची पॅकेट, त्याला लागणार्‍या वस्तू (hand chopper, mixer, cooker ring etc) असे गोळा करून ठेवले. त्याला गावरान गवार आवडते म्हणुन किलोभर आणून तिला मसाला लावून कडक उन्हात वळवून पॅक करून ठेवली. आता प्रश्न होता हे सर्व airline च्या नियमानुसार नियोजित वजन निर्देशानुसार कसे पॅक करायच ह्याचा ? 😂

आम्ही बॅग पण 9 तारखेला रात्री 9.30 ला विकत घेतल्या. कारण घरातल्या बॅग मध्ये आमचे सामान मावत नव्हते 😁. दुसर्‍या दिवशी सकाळी 10.30 ची फ्लाइट. सर्व बॅग पॅक करून झोपायला 11.30/ 12 वाजले. सकाळी 5 ला उठून आवरून 7.40 ला airport वर पोहोचलो.

चेक इन काऊंटर वर बॅग्स दिल्या तर तिघांना मिळून 75 kg चेक इन आणि 21 kg Carry on baggage allowed आहे. पण आम्ही carry on baggage जास्त नको (ह्यानी रजा टाकली तरी emergency मेल etc साठी लॅपटॉप बॅग घेतली होती आणि आम्ही जॅकेट, स्कार्फ आणि मेडिसिन साठी एक छोटी सॅक घेतली होती) म्हणुन जास्त सामान चेक इन मध्ये टाकलेले. Airline काऊंटर वर ते लोक ऐकेना म्हणुन airport वर अजून एक बॅग विकत घेतली. 😂 (चेक इन बॅग्सचे वजन 82 होते. जे 75 kgs allowed होते.) ते extra per kg 1200 rs म्हणजे 7 kg साठी 8400 rs मागायला लागले.

ते पण फक्त मुंबई दुबई सेक्टर साठी तेवढे आणि मग परत दुबई स्टॉकहोम सेक्टर ला अजून भरण्या पेक्षा छोट्या बॅग मध्ये 6000 rs invest केलेले परवडले असा विचार केला आणि काऊंटर च्या बाजूला जावून सामान छोट्या बॅग (लाडू चकली आंबा बर्फी, नाश्ता /भाज्यांची काही पॅकेट) मध्ये ट्रान्सफर करून चेक इन च 75 kgs मॅनेज केल. (परत एकदा हुश्श झाल 😂)

केबिन baggage chi छोटी बॅग बरोबर 7 kg chi झाली 😅security check करताना तिथल्या माणसाने ती छोटी बॅग उघडून बघितली आणि हसायला लागले. मला विचारले, पण मॅडम एवढा खाऊ दुबई साठी का घेवून जाताय ? (बोर्डिंग पास बघतात ना ते त्यामुळे त्यांना ते समजते) देशमुख म्हणुन मराठी च होते. त्यांना सांगितले, अहो आम्हाला पुढे स्टॉकहोम ला जायचय. लेका साठी म्हणून खाऊ घेतलाय. मग त्यांनी स्वतःच आम्हाला हॅप्पी journey विश केल. 😊

इमिग्रेशन प्रोसेस झाल्यावर नाश्ता करून बोर्डिंग गेट जवळ जावून बसलो. फ्लाइट बोर्ड करून अजून एकदा मनात हुश्श केल (असे खूप वेळा हुश्श वाल feeling येत एकदाची आमची गाडी /विमान मार्गी लागले 😅 चालले बाबा लेका कडे ह्या feeling ni 😁)

दुबई ला पोहोचल्यावर तिथले सिम कार्ड 24 hrs साठी free असे complimentary मिळाले. तिथेच डान्स करावा वाटला 😜 जसा सुप्रिया पिळगावकर नी माझा पती करोडपती मध्ये केलाय (बंगले वाले तुमच्या खिडक्यांना छान छान पडदे लावा स्टाइल 😂 दुबई वाले तुमच्या पाहुण्यांना फ्री सिम कार्ड वाटा 💃😁)

त्या सिम कार्ड चा उपयोग करून लगेच तिथल्या मैत्रिणी ला फोन करून सांगितलं की आहे 3 दिवस. Sightseeing च्या वेळा सांभाळून भेटू यात. तिथे पोहोचलो तेव्हा दुबई टाइम प्रमाणे 12 वाजले होते. हॉटेल वर पोहोचे पर्यंत 1.30 झाले. फ्लाइट मध्ये खाणे झाले होते, त्यामुळे फ्रेश होऊन मस्त ताणून दिली. (रात्रीची झोप नीट झाली नव्हती).

मग संध्याकाळी एकदम 5.30 लाच मैत्रिणी च्या फोन मुळे जाग आली. तिच्या बरोबर दुसर्‍या दिवशी रात्री भेटायचे ठरवले. ती आणि तिचा नवरा, दोघेही माझे फ्रेंड्स आहेत. आम्ही कॉम्प्युटर मॅनेजमेंट करताना एकत्र होतो.

त्या दिवशी संध्याकाळी आम्ही जास्त दगदग होणार नाही आणि निवांत बघता येईल अश्या ठिकाणी जायचे ठरवले. म्हणुन मग दुबई फ्रेम च्या जवळ असलेल्या एका दुबई ग्लो पार्क मध्ये गेलो.

तिथे एक खूप छान 3D museum आहे. ते बघून थोडा आजूबाजूला टाइम पास करून हॉटेल वर आलो. आणि दुसर्‍या दिवशीचे प्लॅनिंग करून परत मस्त ताणून दिली.
(पुढील भाग व लिखाण वेळ मिळेल तसे केल जाईल 😅)

सुप्रिया सगरे

— लेखन : सौ सुप्रिया सगरे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

17 COMMENTS

  1. Very well written…..Supriya….your experience will certainly help people who wish to travel…thanks sharing detailed description

    • धन्यवाद सर 🙏 तुमच लिखाण पण छान असत. तुम्ही पण ह्या वेब पोर्टल वर दिलेल्या Contact नंबर वर पाठवू शकता.

  2. विदेशप्रवासाचे अप्रतिम चित्रण.

  3. खूप सुंदर प्रवास वर्णन. प्रवासाला निघताना असंच काही अफलातून घडलं की ,त्याची मजा आणखीनच वाढते आणि प्रवासाला चार चांद लागतात. सुंदर शब्दांकन

  4. खूप छान लिहिलंस सुप्रिया… तुझ्या सोबत मी ही फिरतेय असंच वाटलं… पुढील भाग वाचायची उत्सुकता लागली आहे..

    • धन्यवाद शिल्पा. पुढील भाग प्रकाशित झाला की त्याची लिंक सामायिक करेन

    • Thanks dear Manisha. तुझ्या कविता पण येउ देत. मी तुला कॉन्टॅक्ट नंबर पाठवते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments