नमस्कार मंडळी.
गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपला
देवेंद्र भुजबळ
संपादक.
१
आपल्या न्युज स्टोरी टूडे ला तिनं वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मनापासून हार्दिक अभिनंदन.
काही अपरिहार्य कारणामुळे मागच्या आठवड्यात बिझी होते त्यामुळे शुभेच्छांना उशीर झाला. तरी क्षमस्व. या वेबपोर्टलमुळे आम्हाला घरबसल्या अतिशय रंजक माहिती मिळते ती ही जगभरातून, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
साहित्य तारका हे सदर तर अत्यंत माहितीपूर्ण वाचनीय असते.
कविताही सुंदर असतात.
खरे तर सर आणि अलका मॅडम अमेरिकेला गेल्या तेंव्हा आम्हाला अजिबात करमले नाही. चुकल्यासारखे वाटत होते.
इतकी या पोर्टलची सवय झाली आहे. आम्हीं सर्वजण त्यासाठी आपले ऋणी आहोत.
देवेंद्र सर, अलका मॅडम, देवश्रीताई तिघांचेही मनापासून आभार.
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
- –– आशा दळवी. दुधेबावी.
२
इर्शाळवाडी – कविता फारच छान आहे..
जमल्यास म्युझिकल करावी….
- — बिपिन चौबळ. निवृत्त चीफ कॅमेरामन, फिल्म्स डिव्हिजन. मुंबई.
३
इर्षाळवाडी कविता फारच छान लिहिली आहे. मन दुखावणारी.
- –– हरिश्चंद्र चव्हाण. कल्याण
४
माननीय सुधाकर तोरणे सर..
गजेंद्र अहिरे म्हणजे खरोखरच एक सर्जनशील व्यक्तीमत्व. आपण त्यांच्या ‘स्टोरी टेलर’ या पुस्तकाचा सुंदर परिचय करुन दिल्याबद्दल धन्यवाद. जरुर वाचेन.
वर्षा भाबल यांची इर्शाळवाडी वरील आपत्तीचे कोकणी काव्य वाचून डोळे पाणावले…
– राधिका भांडारकर. पुणे.
५
“देवदूत” खुप सुंदर… प्राण्यांना पण जीव लावलेला कळतो आणि एकटे पण घालवायलाही त्यांची सोबत महत्वाची आहे.
- –– अर्चना मायदेव. पुणे
६
कारगिल मधील स्मारक मी पाहिले आहे. वीरगती प्राप्त झालेल्या सर्व शहिद जवानांना सलाम.
- –– गणेश जोशी.व्यंगचित्रकार, ठाणे.
७
शुद्ध आत्मा अप्रतीम 👌👌🌹🌹😊🙏
- –– गंधेकाका. टिव्ही आर्टिस्ट.
८
खूप खूप मनापासून धन्यवाद !… सन्माननीय श्री. देवेंद्रजी भुजबळ साहेब आणि
सन्माननीय सौ.अलकाताई भुजबळ !… खरचं ….आपल्या …
न्यूज स्टोरी टुडे या वेबपोर्टल वर प्रसारित होणारी प्रत्येक बातमी, कथा,कविता,लेख,गझल काव्य संग्रह, कथानक, प्रवास विशेष ,… आपले सण संस्कृती विषय… एवढे अप्रतिम आणि वाचनीय असतात की त्यांचं आणि ते साहित्य लिहिणाऱ्या प्रत्येक लेखकांचं कौतुक करावं तितकं थोडेच आहे !… खरं पाहता आपण आपल्या ह्या न्युज स्टोरी टुडे….या वेबपोर्टलच्या माध्यमातून उभं केलेलं हे व्यासपीठ आज अगदी नवोदित लेखकानां सुध्या त्यांच्या कथा, साहित्य लेखनाच्या माध्यमातून त्यांनां जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवितो आहे !…आणि …आपल्या न्यूज स्टोरी टुडे वेबपोर्टलच्या माध्यमातून आमच्या सारख्या वाचकांना नवं – नवीन कथा, लेख, कविता आणि विविध प्रकारचे साहित्यं वाचायला मिळतं हे आमचं अहो भाग्यच आहे.
आपण लावलेल्या न्युज स्टोरी टुडे नावाच्या रोपट्याचं रूपांतर एका मोठ्या वटवृक्षात होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !…
- — अनिल घरत. उरण
९
दुर्मीळ पुस्तके ४ : “आलोक” – प्रा. भगवंत देशमुख या लेखावरील अभिप्राय…
खूपच छान। धन्यवाद।
– श्री अजय भगवंत देशमुख
In his fourth episode of rare books series, Vilas kudke has dished out for us book titled “Alok” written by the great author Bhagwant Deshmukh who was otherwise gone off the memory . Deshmukh’s role as a writer is admirable who with his unending efforts added to the glory of Marathi literature. Kudke delves into n unveils this greatness of author.
Deshmukh note only written several books but also he did hard work to enrich Marathi literature by translation and compilation excellent literary works from eg compilation of B Raghunath’s poetry,translating Amir Khusro’s works in Urdu, Dennis Kincaids Grand Rebel in english n others. Alok meaning bring to light n certainly kudke’s work on forgotten books with the editting support of Bhujbal sir throws light reveals the hidden beauty in such books. They have opened for us a literary treasure house created the by author Bhagwant Deshmukh. On readers behalf I express our thankfulness towards both.
– Shri Ranjitsinh Chandel. Yavatmal
आपली साहित्यिक तळमळ प्रशंसनीय आहे.
– श्री भिक्कू महेंद्र कौसल, माजी संचालक (माहिती)
Chhan lihilet… eka sundar pustakacha parichay zala aaj… asech Lihit ja …
– डाॅ. वैशाली वीर, उपसंचालक (प्रकल्प /प्रशासन), महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
खूप छान, Khup sunder
– श्री आप्पासाहेब पाटील, श्री परेश ज. चव्हाण, सहायक संगणक प्रोग्रामर, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
मराठी साहित्याचा अभ्यास करून चिकीत्सा केलेली दिसते. मुळात नासिककर छान लिहीतात.. बोलतात. त्यात गोडवा आहे. दिसायला सुंदर आहेत. शिरवाडकर पासून तर कुडके पर्यंत…
– श्री सुधाकरराव धारव, माजी उपसंचालक (माहिती)
दुर्मीळ पुस्तकाबद्दल माहिती मिळाली, खूप छान अणि धन्यवाद सर .
– श्रीमती रेणुका वाघ
सरांच्या समग्र लेखनाचा छान आढावा . ५९-६० मध्ये रसाळ सरांनी आम्हाला “आलोक” शिकवले होते, ते कायम स्मरणात राहिलेले.
- — श्रीमती लता मोहरिर
उत्तम लेख ! स्व. प्राचार्य भगवंत देशमुख यांना विनम्र अभिवादन ! मसाप मधील कार्यक्रमात त्यांची भेट व्हायची ! वेळोवेळी महाविद्यालयीन अभ्यासक्रमात असलेलं त्यांचं साहित्य मी शिकवलेलं आहे.
– श्री देवकर्मा मदन
भरून पावलो ! छान उजाळा आणि माहिती !
– श्री जयंत पी. बारिदे
आम्ही भाग्यवान त्यांचा आम्हाला मराठीचे प्राध्यापक, शिस्तप्रिय उपप्राचार्य व कौटुंबिक जबाबदार मार्गदर्शक म्हणून जवळून सहवास लाभला. रामराव वैद्य आमच्या काकांचे (मावशीचे यजमान) ते जवळचे मित्र व अजय व कुमारचे वडील म्हणून विशेष परिचित होते.
– श्री मुकुंद देशपांडे
त्यांच्या सोबत आयुष्यातील काही क्षण घालवता आले, हे भाग्य.
– श्री प्रदीप कुलकर्णी
उत्तम प्रकारे श्री भगवंत देशमुख यांच्या लिखाणाचा आढावा घेतला आहे. धन्यवाद
– श्री शशांक टिळक
तुमच्या लेखनाने थोडे विस्मरणात गेलेले ‘आलोक’ मधले भगवंतरावांचे लघुनिबंध पुन्हा आठवले …त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांना उत्तम शिकविलेच पण येवढेच नाही, त्यांनी आम्हाला ‘रसिक’ बनविले . ज्ञानेश्वरी, पंतवाङमय ह्यासारखे जुने काव्य असो वा बालकवी, कुसुमाग्रज, बी.रघुनाथ ह्यांची कविता असो, ह्या सगळ्याच काव्याचे इतक्या रसिकतेने ते परिशीलन करीत की ती काव्ये आम्हा विद्यार्थ्यांच्या कोवळ्या, संवेदनाक्षम मनात ठसूनच जात. त्यांचे शिकविणे हे आस्वादक काव्यसमीक्षेचा वस्तुपाठच असे. आम्ही त्यांच्या विद्यार्थिनी होतो हे आमचे भाग्य !
– श्रीमती मीना मनसबदार
सर कसे रागावत होते हे फार कमी लोकांना माहीत असेल. मी आणि श्रीकांत कुलकर्णी, कुमार साठी आम्ही त्यांचा राग अनुभवला आहे.
– श्री राम देशपांडे
गुरूवर्य भगवंत देशमुख यांना विनम्र अभिवादन. या लेखामुळं आलोक या लघुनिबंधसंग्रहाची आठवण ताजी झाली. हा संग्रह आम्हाला आमच्या बी.ए.च्या अभ्यासक्रमात होता.आणि भगवंत देशमुख हे आमचे सरच होते. पण तो शिकवला प्रा.गो.मा.पवार सरांनी. भगवंतरावांनी आम्हाला ह.श्री.शेणोलीकर संपादित ज्ञानेश्वरीतून निवडलेले वेचे (ज्ञानेशाची अमृतवाणी) शिकविले. त्यांचं विवेचन,ओघवतं, रसाळ, अभ्यासपूर्ण, स्पष्ट, लक्षवेधी आणि सहजसुंदर वाटावं असं असे. मी पैठण, धर्माबाद, गंगापूर आणि नांदेड (प्र.नि.महाविद्यालय) येथे असताना त्यांना शाहिरी (लावणी) वाड्.मयावर व्याख्यानासाठी पाचारण केले होते. त्यांचं त्या विषयावरचं विवेचन मला विशेष आवडत असे. त्यांची निवडक पुस्तकं माझ्याकडं आहेत. ‘अनमोल वारसा’ची तर हस्तलिखीत प्रतच मला त्यांनी दाखविली होती. त्यांच्या अशा अनेक मनोरम आठवणी माझ्या मनात वास करीत असतात. नमन.
– श्री भगवंत क्षीरसागर
आदरपूर्वक आदरांजली
– श्री उदय भावठणकर.
आलोक बद्दल ऐकून होतो.. पण मला ते वाचण्याचा योग आला नाही..अजय देशमुख यांच्याबद्दल काय लिहिणार.. कुमार देशमुख सर आजही झापायला कमी करणार नाहीत..एक हाडाचा शिक्षक. भगवंतराव सर, माझे, बाबांचे व त्रिलोचनकाका ह्यांचे जवळचे स्नेही..
– अरविंद कुलकर्णी. स्नेहसावली, संभाजीनगर
आदरणीय व्यक्तीमत्वाबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती !
– श्री भालचंद्र कुलकर्णी
प्रा भगवंतराव देशमुख म्हणजे आमचे आजोबा, माझे बाबा डॉ चंद्रकांत धांडे यांचे मावसे, बाबांच्या मुळे आम्हाला लहानपणापासून त्यांचा सहवास लाभला• आम्ही त्यांना मोठे काका म्हणत असू. त्यांचे मराठी साहित्याला लाभलेले योगदान प्रचंड महान आहे.साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद, मराठी विश्वकोष तयार करतांना त्यांची विदवत्ता याचे मला बाबांच्या सोबत त्यांच्याकडे जात असल्याने खूप कुतूहल वाटत असे.
आम्ही पैठण येथे राहत होतो, त्यांचे बालपण सुद्धा पैठणचेच, त्यामुळे त्यांना पैठण बद्दल विशेष प्रेम होते, केवळ त्यांच्यामुळे आम्हाला कविवर्य बा भ बोरकर, श्री वामनराव चोरघडे, प्रा राम शेवाळकर, श्री व्यंकटेश माडगूळकर यांचा देखील सहवास लाभला. आज माझे बाबा असते तर त्यांनी मोठ्या काकांच्या अनेक आठवणी सांगितल्या असत्या. बाबांनी प्रा भगवंतराव देशमुख यांचे बद्दल लेख लिहिले आहेत आणि लवकरच ते मी सादर करीन.
आमच्या सर्व कुटूंबियांची या निमित्ताने मानवंदना.
-श्री श्रीकांत धांडे
छान लिहिलेत., खूप छान लिहिलय. अभिनंदन; GREAT POST !
– श्री विठ्ठल ठाकूर, -श्री मोहन राठोड, माजी उपसंचालक (माहिती), श्री प्रकाश महामुनकर
१०.
सौ पौर्णिमा शेंडे ह्यांच्या “टोमॅटो” कवितेवर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
वा सुरेख.पुर्णिमा, छान केलेयस कविता.
टॉमेटोची तर सध्या फारच गंमत चाललेय. मध्यंतरी चॅनलवर , भाव मिळत नाही म्हणून शेतकर्यांनी रस्त्यावर टॉमेटो फेकून, पायदळी तुडवले होते, तेव्हा जीव अक्षरशः कळवळला होता. अरे कुठे तरी गरीबांना, आदिवासी भागात द्या ना.
पायदळी तुडवलेलं ते अन्नच होतं, ते शाप नाही देणार ?
आता बसा तडफडत. पण तू छान सांगितलंयस.
खरंच तो आपलाच आहे. आंबा मोसमात, नाही कां !
- – नीता प्रधान.
पूर्णिमा खरच तू जे लिहतेस ते अप्रतिमच असत मग लेख असो ती कविता,मला नेहमीच वाचायला आवडत,आतापण बघ न तुला पोर्टल मिळाल्याचा आनंद किती झालाय हे तू अशा छान शब्दात व्यक्त केलस की मला पण तो आनंद अनुभवता आला,तुझ्या प्रतिभेच झाड खूप खूप बहरू दे आणि मला काय सगळ्यांनाच त्या फुलांचा सुगंध मिळू दे.
तुला चौथ्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा.
- – संध्या ढोबळे
११.
सौ सुजाता येवले यांच्या कवितेवर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
Very beautiful composition, most of the language went over my head 😰 as the writing is of a very high quality, it goes over head for a common Marathi person like me,
but the meaning is very beautiful and heart touching.
–डॉ. अनिल भोकरे M.D. dermatologist. मालेगाव
खुप छान.; खूपच छान आहे कविता
-Dr. Er.Nitin Deore U. S; Prof. Dr. Monali Borse
भयावह स्थिती च शब्दात केलेले आकलन
– विलास पंचभाई. सचिवः साहित्यकणा फाउंडेशन
अतिशय सुंदर मनातील भावना मांडल्या आहेत प्रगल्भ लिखाण.
- – प्रा ज्योत्स्ना मोराणकर
नुसत्या शब्दात सांगणं कठीण पण खूप सुंदर झाली आहे कविता. त्यातल्या स्त्रीच्या वेदना काळजाला भिडल्या… शब्द वेल्हाळ.. खूप खूप अभिनंदन मॅडम.
–सौ मंजिरी पाटील. गृहिणी
स्त्रीचे वास्तव अतिशय सुंदर शब्दात मांडलेस सुजाता. मनाला चटका लावून जाणारी कविता..
–सुरेखा मैंद. अभिनेत्री, नृत्यकलाकार
स्री जन्मा, तुझी कहाणी…
वर्षानुवर्षे तेच ते कधी बदलणार आम्ही
– शुभांगी मेतकर. Bra. Man. S B I Kothrud
दिव्य वाट
दिव्य-वाट/खूप प्रखर वास्तव तितक्याच ताकदीने मांडल आहे.. आतून आलेल्या भावना अश्या व्यक्त होतात..
–सौ.अलका अमृतकार. कवयित्री, लेखिका.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800