Wednesday, September 17, 2025
Homeपर्यटनमाझं परदेश भ्रमण : 6

माझं परदेश भ्रमण : 6

मागच्या भागात आपण Helsinki ह्या Finland च्या राजधानी मध्ये पोहोचलो. हे पण फार शांत शहर वाटले. Tallinn आणि Helsinki ह्या दोन्हीही शहरांची लोकसंख्या जास्त नसावी. स्टॉकहोम च्या मानाने हि दोनही शहरे कमी गर्दीची व शांत निवांत वाटली. अगदी आपल्या पुण्यापेक्षा निवांत ! 😄 बस, ट्राम, लोकल ट्रेन, ferries मध्ये जास्त गर्दी जाणवली नाही.

Finland मध्ये पण आधी स्विडीश व नंतर रशियन राजवट होती. 6 डिसेंबर 1917 ला ते रशियन राजवटी पासून स्वतंत्र झाले. फिनिश आणि स्विडीश ह्या दोन्ही हि इथल्या अधिकृत व राजकीय भाषा आहेत. इथे शाळांमध्ये पण ह्या दोन्हीही भाषा शिकवतात. त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये प्रथम फिनिश व नंतर स्विडीश भाषेत घोषणा/announcement होते. चिराग ला स्विडीश समजत असल्याने आम्हाला ते सोपे गेले.

19 तारखेला सकाळी लवकर आवरून नाश्ता करून आम्ही आधी तिथला समुद्री किल्ला बघायचे ठरवले. त्याचे नाव Suomenlinna (Sveaborg). हि एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट आहे.

इथे जाण्यासाठी आम्ही प्रथम ट्राम व फेरी स्टँड पासून फेरी घेतली. ह्या फेरी मध्ये लोक आपली स्कूटर, सायकल, फोर व्हीलर सकट व पेट डॉग ला पण बरोबर घेऊन येतात. अश्या वेळी मला इरा ची खूप आठवण यायची 🙂

ह्या किल्ल्याचे बांधकाम स्विडीश Admiral Augustin Eherensvärd (1710-1772) ह्यांच्या देखरेखीखाली झाले. त्यानंतर रशियन सैन्याने ह्यावर ताबा मिळवला. त्यामुळे इथल्या बांधकामाच्या स्टाइल/आर्किटेक्चर मध्ये स्विडीश व रशियन अश्या दोन्हीही स्टाइल दिसतात. ह्या किल्ल्याचा ताबा रशियन सैन्याने कसा मिळवला ह्याची फार रंजक कथा ऐकायला मिळाली.

थंडीच्या दिवसात सगळीकडे बर्फ असताना रशियन सैन्याने ह्यावर हल्ला केला. समुद्रात पण त्यामुळे glacier तयार होते. अश्या स्थितीत स्विडीश सैन्याला रसद पुरवठा कसा होणार व आहे ती रसद किती दिवस पुरणार ह्याची काळजी स्विडीश admiral ला होती. त्यात रशियन सैनिक एका वेळी 2 बाजूने म्हणजे एका बाजूने थोडे तर दुसर्‍या बाजूने थोडे सैनिक असायचे. त्यानंतर हे सैनिक रात्री मध्ये बर्फ असूनही दिशा बदलायचे. (शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याची फार आठवण आली हि कथा ऐकताना). ह्यामुळे स्विडीश admiral ला खूप सैन्य आहे व ते त्याला कसा विरोध करणार असा प्रश्न पडला आणि त्यांनी रशियन बरोबर तह करून किल्ला त्यांच्या ताब्यात देऊन आपल्या सैन्याला तिथून जाईपर्यंत सेफ passage द्यायला सांगितले. आणि विचार करा त्यावेळी मोजून 8 ते 10 रशियन सैनिक त्या किल्ल्या जवळ लढण्यासाठी होते. म्हणजे अक्षरशः वेडे बनवून तो किल्ला ताब्यात घेतला.

ह्या किल्ल्यावर लोकांची घरे आहेत व प्रोटेस्टंट चर्च पण आहे. इथे 850 लोक राहतात. पर्यटकांसाठी इथे इंग्लिश मध्ये guided टूर आहे ज्यात ह्या किल्ल्याच्या इतिहासाविषयी, त्या परिसरात नेवून माहिती सांगितली जाते. शिवाय इथे finland Navy च maritime training school आहे.

ह्या किल्ल्यावर तिथल्या सर्व बिल्डिंग ची अतिशय व्यवस्थित देखरेख व परिसरात बगीचा करून सुशोभीकरण करण्यात आले आहे. पर्यटकांना बसून तिथल्या निसर्गाची मजा अनुभवता येईल अशी खूप सारी ठिकाणे बनवली आहेत. शिवाय एक souvenir दुकान व कॅफे देखील आहे. इथे आम्ही दुपारचे जेवण म्हणुन थोडे खाल्ले व कोल्ड कॉफी घेतली. बाहेर गरमी खूप होती, त्यामुळे कोल्ड कॉफी घ्यावी वाटली.

हा किल्ला व परिसर खूप छान व स्वच्छ आहे. तिथून निघावंस वाटत नव्हते. तिथे बगीचा मध्ये गवत काढणार्‍या फार गोड शाळकरी मुली होत्या. समर जॉब म्हणून त्या ते काम करत होत्या. त्यांच्या बरोबर पण गप्पा मारल्या 😄.

दर 20 मिनिट ला फेरी होती. किल्ल्यावर 4 ते 5 तास घालवून आम्ही परत helsinki ferries पोर्ट वर आलो. तिथे बाजूच्या मोकळ्या जागेत farmer’s मार्केट लागले होते. ज्यात फ्रेश berries, सॅलड व पालेभाज्या होत्या. त्यामुळे Berries तर विकत घेतल्याच. तो मोह आवरता आला नाही. 😆 इथे शेपूची भाजी सॅलड ड्रेसिंग साठी वापरतात 😃. आमच्या घरात शेपू म्हटले की तोंड वाकडं करणार्‍यांना म्हटले, राहूया का Finland मध्ये च ? 😂

फिनिश लोक फार म्हणजे फारच भिडस्त असतात. स्विडीश व Estonian लोकांच्या तुलनेत म्हणायचे झाले तर त्यांच्या दोन गुणे (square) 😅. चिराग म्हणाला, मम्मा तू कोणाशी न बोलता राहू शकशील तर आम्ही इथे राहून शेपू खाऊ 🤣 त्यामुळे तो प्लॅन कॅन्सल करावा लागला 😁

तिथून चालत (साधारणपणे 300 ते 400 मिटर) जवळ असलेल्या Uspenski Cathedral चर्च बघायला गेलो. हे चर्च एका टेकडीवर असल्याने थोडे उंचीवर आहे. मात्र इथे जाण्यासाठी पायर्‍या आहेत. ह्या चर्चचे बांधकाम प्रोटेस्टंट पद्धतीचे आहे. ह्या चर्च च्या बांधकामाचे डिझाईन एका रशियन आर्किटेक्चर नी केलय. बांधकाम पूर्ण होवून या चर्चचे 1868 मध्ये उदघाटन झाले. थोडे उंचीवर असल्याने इथून खाली Helsinki शहराचा व समुद्राच्या दिशेचा नजारा छान दिसतो.

सोमवार असल्याने चर्च बंद होते. त्यामुळे त्या दिवशी ते आतून बघता आले नाही. तिथून मग अजून थोड पुढे (साधारणपणे 600/700 मिटर) पुढे असलेल्या Helsinki Senate Square कडे चालत गेलो.
अश्या शहरांमध्ये चालत भटकंती करायचा एक वेगळाच अनुभव असतो.

Senate square हि जागा एका graveyard वर बांधली असून आता तिथे finland च्या prime minister आणि cabinet ministers ची कार्यालये आहेत. त्या समोर मोठे पटांगण आहे. ह्यात मधोमध सम्राट Alexander II ह्यांचा पुतळा आहे व त्याच्या आजूबाजूला सुशोभीकरण करून बसायला बाकडे पण आहेत. तसेच Senate square च्या पायर्‍यांवर देखील लोक बसून गप्पा मारताना दिसले. इथे I Love Helsinki असा बोर्ड असून पर्यटक इथे फोटो काढतात.

Senate square च्या समोरच्या बाजूला University of Helsinki ची मुख्य इमारत आहे. इथे बसून परीसर न्याहाळताना अचानक आम्हाला मराठी कुटुंब भेटले. त्यांच्या बरोबर थोडा वेळ बोलून आम्ही तिथल्या एका प्रसिद्ध बगीच्या कडे निघालो.

Esplanadi Park हा बगीचा Senate square पासून 700/800 मिटर वर आहे. हा सर्व परीसर helsinki Central station जवळ आहे. त्यामुळे चालत हिंडायची तयारी ठेवायची.

ह्या पार्क च्या आजूबाजूला मार्केट आहे. तसच पार्क मध्ये एक open auditorium आहे. इथे उन्हाळ्यात वेगवेगळे कलाकार येवून गाणी म्हणतात, गिटार वाजवतात, कोणी नाचतात. खूप प्रफुल्लित व जोशपूर्ण वातावरण असते.

खूप लोक इथे चालण्यासाठी, पाळीव प्राण्यांना घेऊन येतात. ह्या बगिच्याच्या मध्यवर्ती चालण्याच्या रस्त्याच्या कडेला खूप बेंचेस आहेत. Finland चे राष्ट्रीय कवी Johan Ludvig Runeberg ह्यांचा पुतळा देखील ह्या बगीचा मध्ये आहे.

त्या बगीचा जवळ खूप सारे रेस्टॉरंट आहेत. 8 वाजले होते पण भरपूर उजेड असल्याने ते जाणवत नव्हते. दिवसभर हिंडलो त्यामुळे आम्हाला सडकून भूक लागली होती. आम्ही थोडे पुढे असलेल्या सम्राट नावाच्या इंडियन रेस्तराँमध्ये जायचे ठरवले.
तिथे थाळी खाऊन चालत थोड पुढे आल्यावर चालायचा खूप कंटाळा आला म्हणून एका बेंच वर बसलो.

लेक helsinki central जवळ च्या सुपर मार्केट मधून दुसर्‍या दिवशी सकाळ साठी दही आणि अजून काही गोष्टी घेऊन येईपर्यंत तिथे बसलो. तो येईपर्यंत रस्त्यावरील गाड्या (त्यांचे वेगवेगळे मॉडेल्स), येणारे जाणारे लोक ह्यांचे निरीक्षण करत बसलो 😁. तो आल्यावर ट्राम नी अपार्टमेंट कडे गेलो. जवळच्या थांब्यावर उतरून आधी तिथल्या बगिच्या मध्ये वेळ घालवून मग घरी गेलो.

19 तारखेचा पूर्ण दिवस फार छान गेला. दुसर्‍या दिवशी काय काय करायचं ठरवून आवरून ताणून दिली. भरपूर चालल्यामुळे पडल्या पडल्या झोप लागत होती 😅.

दुसर्‍या दिवशी च्या सफर साठी पुढील भागात लवकरच भेटू यात. कळावे लोभ असावा 😃🙏

— लेखन : सुप्रिया सगरे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. खूप छान सुप्रिया ! सहज आणि सुंदर भाषा जणू आम्ही तुझ्या बरोबर प्रवास केला असा अनुभव आला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं