भारत एक असा देश आहे जिथे वेगवेगळे सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. त्याचप्रमाणे आपली खाद्य संस्कृती पण बदलत असते. तसाच एक पारंपरिक पदार्थ मी घेऊन आली आहे, तो म्हणजे नारळी भात.
साहित्य :-
- तांदूळ 1 वाटी
- ओल्या नारळाचा कीस 1 वाटी
- साखर. 1 वाटी
- लिंबाचा रस. 1 चमचा
- वेलची जायफळची पावडर
- तूप. 2-3 चमचे
- ड्राय फ्रुट्स. आवडीनुसार
- मीठ. चवीपुरतं
कृती :
एक कप तांदूळ स्वच्छ धुऊन त्यामध्ये चवीपुरतं मीठ व एक चमचा तूप घालून मोकळा भात शिजवून घेणे. भात तयार झाल्यानंतर त्याला गार होण्यासाठी एका मोठ्या ताटात किंवा परातीत पसरून ठेवणे. तयार असलेल्या भातामध्ये किसून ठेवलेला ओला नारळ मिक्स करून घेणे. पाक करण्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये एक कप साखर व अर्धा कप पाणी घालून एकतारी पाक बनवून घेणे. पाक तयार झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा तूप, एक चमचा लिंबाचा रस, वेलची, जायफळाची पूड घालून मिक्स करून घेणे. गार करून ठेवलेल्या भात व नारळाचा मिश्रण तयार असलेल्या पाकामध्ये घालून व्यवस्थित एकजीव करून घेणे. आवडत असल्यास थोडासा खाण्याचा रंग घालून भात तयार करून घेणे. तयार भातावर दोन चमचे तुपामध्ये दोन ते तीन लवंग व आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालून बनवलेली फोडणी द्यावी आणि हा भात गरमागरम सर्व्ह करावा…
ह्या रेसिपीच्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे 👇🏼
रेसिपी लिंक :
https://youtu.be/_jTSUQKQmbw?si=MsnUFqVVOwmQI0Xv
चैनल लिंक:
https://youtube.com/@grahrajkitchen873?si=c4_NMJwnSYhw4miH

— लेखन : ममता कुंदप. सातारा
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800