परतून या, मी आशेने, वाट पाहीन,
या घरी या, मी दारात, उभी राहीन,
विसरून जा त्या चुका, तो प्रसंग,
मी माफ करीन, नको पुन्हा वादंग,
प्रत्येक घरी ते, काही असेच घडते,
रूसवेफुगवे, अन राग लोभ ते भलते,
पण गाठायाचे नाही कुणीही टोक,
आहोत माणूस, चांगला म्हणू दे लोक,
आयुष्य असे हे सुख नी दु:खही येते,
घर तेच खरे हो, जे त्यातून सावरते,
उमेद ती बांधून, रहावे पुन्हा ऊभे,
येतील फिरून, ते दिवस सणांचे नवे..!!!

— रचना : हेमंत भिडे. जळगाव
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800