- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण मनामध्ये कायम राहतीलच. परंतु लंडन इथल्या स्मारकाचे सुशोभीकरण, अंतर्गत व्यवस्था अधिक सुंदर कशी करता येईल यासाठीचे काम निश्चितपणे करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
महाराष्ट्र विधान मंडळाच्या अभ्यासदौऱ्यावरील शिष्टमंडळाने शुक्रवार, दिनांक ०१ सप्टेंबर, २०२३ रोजी लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट दिली. यावेळी डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. याप्रसंगी केंद्र सरकारच्या नेहरू सेंटरचे श्री. संजयकुमार शर्मा, स्मारक व्यवस्थापक श्री. फहाद उपस्थित होते.

यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानाला महाराष्ट्र सरकाने शासकीय दर्जा दिला आहे. त्यामुळे येथील उपक्रमात सहभागी होण्याची संधी महाराष्ट्र सरकाने लोकांना उपलब्ध करून दिली आहे. हे फार चांगले पाऊल महाराष्ट्र शासनाने उचलेले असून सरकारतर्फे ऊत्तम निगराणी केली जात आहे त्याबद्दल समाधान व्यक्त करून इथे असलेली व्यवस्था ही आणखीन समृद्ध कशी करता येईल यावर काम करणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
- — टीम एनएसटी. ☎️ 9869484800