माणूस थांबला आहे
बियांचं रुजणं थांबलं नाही
रोपाचं वाढणं थांबलं नाही,
फुलाचं फुलणं थांबलं नाही,
फळांचं पिकणं थांबलं नाही
फक्त…..
आधुनिकतेने पछाडलेला
माणूस थांबला आहे
निसर्गाचं गाणं थांबलं नाही,
वाऱ्याचं वाहणं थांबलं नाही
नदीचं खळाळणं थांबलं नाही
सूर्याचं तापण थांबलं नाही
चंद्राच चांदणे शिंपणं थांबलं नाही
फक्त…..
भौतिक सुखांच्या कैफ़ातला
माणूस थांबला आहे
चिमण्यांची चिव चिव थांबली नाही
कोकिळेची कुहू कुहू थांबली नाही
वासरांचं हम्बरणं थांबलं नाही
मोराचं नाचणं थांबलं नाही
फक्त…….
निसर्गा पासून दूर गेलेला माणूस थांबला आहे.
.. फक्त तो ओथंबला-थांबला आहे

– रचना : डॉ. मधुकर लहानकर
👌सुंदर कविता
🙏
खरे आहे
खूपच छान