हेलसिंकी हून 20 जून ला संध्याकाळी 5 ला क्रुज निघाले व 21 ला सकाळी 10.30 ला स्टॉकहोम पोर्ट वर पोहोचले. ह्या क्रुज मध्ये जास्त करून कुटुंब बरोबर असलेले लोक होते कारण हा मधला वार (मंगळवार) होता.
आम्ही सामान घेऊन आधी बस व नंतर मेट्रो ने स्टॉकहोम सेंट्रल ला गेलो. क्रुज च्या रूम मध्ये फ्रेश झाल्यामुळे 21 तारखेला स्टॉकहोम मध्ये फिरायचे ठरले. त्यामुळे स्टॉकहोम सेंट्रल च्या लॉकर रूम मध्ये सामान ठेवून आम्ही स्टॉकहोम सिटी हॉल कडे चालत निघालो.
चालत आम्हाला 10 ते 15 मिनिट लागले कारण जाता जाता रस्त्यात पण फोटो काढत गेलो 😃(शास्त्र असते ते 😁). स्टॉकहोम सिटी हॉल ला 100 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने तिथल्या इतर वेळी बंद असणारे काही भाग (जसे की घड्याळ्याच्या टॉवर ची जागा) टिकीट लावून प्रवेश दिला जात होता. हि जागा वर्षातून एकदाच (mid summer फेस्टिव्हल) अश्या वेळी लोकांसाठी उघडतात. आणि टिकीट हि फार कमी प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे प्रवेश लगेच बंद होतो. आम्हाला ते वर जाऊन बघायचा योग त्या दिवशी नव्हता 😔. फार डोकं लावून वागतात हे लोक. आपणही आपल्या कडील सुरेख स्थापत्यशास्त्र असलेल्या इमारतीं ना असे केले पाहिजे असे मनात आले !
दुसर्या दिवशी तिथे स्विडीश राजघराण्यातील लोक येवून स्टॉकहोम सिटी हॉल मध्ये त्या वास्तूला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एक समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्याचे यजमान म्हणून येणार होते. त्यासाठी तिथल्या Banquet हॉलचे सुशोभीकरण व बाकी व्यवस्थापन चालू होते. ह्याच हॉल मध्ये नोबेल पारितोषिक विजेत्यां साठी जेवण आयोजित केले जाते. KTH विद्यापीठाचा दीक्षांत समारोह पण ह्याच हॉल मध्ये होतो.
हा हॉल इतरही सामाजिक समारंभांसाठी (लग्न, baby shower, music shows, art exhibitions etc) वापरला जातो. हा हॉल 1911 मध्ये बांधायला चालू केला व ह्याचे बांधकाम 1923 मध्ये पूर्ण होवून 23 जुन 1923 ला ह्याचे उदघाटन होवून तो लोकांसाठी खुला झाला.
ह्या हॉल ची जागा लेक मॅलॅरेन च्या तीरावर आहे व फार सुंदर स्थानी आहे. ह्याचे स्थापत्य फार सुरेख आहे. युरोपीयन स्टाइलचे स्थापत्य आहे. ह्यात ब्लू हॉल व गोल्डन हॉल असे 2 हॉल आहेत. ब्लू हॉल हा Scandinavian देशांमधला सर्वात मोठा हॉल आहे. इथल्या टॉवर ची उंची 106 मिटर आहे व इथे लिफ्ट किंवा पायर्यांनी (365 पायर्या) जाता येते. इथल्या छतांवर, भिंती व खांबावर पण carving केलेले आहे. Ceiling height पण भरपूर उंच आहे. शिवाय मध्ये चौका सारखी थोडी मोकळी जागा पण आहे.

लेक च्या बाजूला पण छान हिरवळ व बगीचा मेंटेन केला आहे. तिथे बसुन लेक चा नजारा पण छान एन्जॉय करता येतो. टॉवर वर 3 गोल्डन मुकुट जे स्विडीश राष्ट्रीय चिन्ह आहे ते आहे. बगीचा व हॉल परिसरात नामवंत स्विडीश लोकांच्या मूर्ती आहेत.
आम्ही तिथे गेलो तेव्हा स्विडीश नौसेना दुसर्या दिवशी होणार्या समारंभासाठी ( ज्यासाठी राजघराण्यातील लोक येणार होते ) हॉल समोरच्या लेक मॅलॅरेन भागात सराव करत होते. आम्हाला ते सर्व फार जवळून बघायला व अनुभवायला मिळाले. अगदी त्यांची नाव वल्हवताना होणार्या हालचाली सुद्धा लयबद्ध होत्या. जवळ जवळ एक तास ते सर्व बघत होतो.
नंतर आम्ही सीटी हॉल व परिसराची guided टूर केली. त्यामध्ये त्यांनी हॉल च्या बांधकामाचा इतिहास पण सांगितला. मन भरेपर्यंत तिथे वेळ घालवून मग आम्ही तिथून निघालो. तोपर्यंत 2.30/3 झाले होते. म्हणून आम्ही सेंट्रल जवळील थाई रेस्टॉरंट मध्ये जेवण करायचे ठरवले.
लेकाला तिथे काय छान पदार्थ मिळतात हे माहित असल्याने त्याने सर्व ऑर्डर प्लेस केली. चौघांना मुद्दाम वेगवेगळे पदार्थ सांगितले म्हणजे सर्व पदार्थ टेस्ट करता येईल हा उद्देश होता 😁. भुक्कड गिरी जोरात चालू होती 😅. तिथे गप्पा मारत आरामात जेवण झाल्यावर तिथून 2 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या Scandinavian फोटो शॉप मध्ये गेलो. लेकाला आमच्या उपस्थितीत त्याच्या पाहिल्या पगारातून Canon कंपनी चा लेटेस्ट DSLR कॅमेरा विकत घ्यायचा मानस होता जो त्याने पूर्ण केला. 😇
प्रशांत आणि चिराग ह्या दोघांनाही छायाचित्रणाची फार आवड आहे. बापूंना पण अशी आवड होती. मला तर वाटत हि आवड अशी आनुवंशिक पिढी दर पिढी पुढे चालत आली आहे 😃 बापूं कडे पण त्या काळातील क्लासिक कॅमेरा होते. बापूंच्या वडिलांना खगोलशास्त्रात रुची व माहिती होती. चिराग मध्ये ह्या दोन्हीही गोष्टी आहेत. त्यामुळे कदाचित तो astrophotography व nature photography शिकला व फार छान करतो. त्याच्या astrophotography साठी त्याला बक्षीस हि मिळाल आहे. त्यामुळे त्याच्या पाहिल्या पगारातून आम्ही त्याच्या बरोबर असताना लेटेस्ट technology चा कॅमेरा घ्यायच त्याच स्वप्न पूर्ण झाल 😇 त्यासाठी देवाचे आभार 🙏

हे सर्व होईपर्यंत संध्याकाळ चे 5 वाजले होते. आम्ही सेंट्रल ला जावून लॉकर मधून सामान घेऊन Soudeteljia च्या ट्रेन नी घरी जायला निघालो. तिथे पोहोचल्यावर बस घेऊन घरी जाईपर्यंत संध्याकाळ चे 7/7.15 झाले. तरी उन्हाळा असल्याने लख्ख सूर्य प्रकाश होता. आणि आमच्या सर्वांच्या मनात ट्रीप च्या आठवणी 😇
घरी गेल्यावर ब्राऊन टॉप मिलेट ची भाज्या घालून खिचडी केली. वन डिश meal करायला पण सोपे आणि खायला पण पौष्टिक. लेकाला श्री धान्य मिलेट पैकी सर्व (5 ही मिलेट) चे खिचडी premixes घरी बनवून vaccume packing (जास्त दिवस टिकण्यासाठी) करून आणल्याचा फायदा झाला 😃.
दुसर्या दिवशी च नियोजन करून ताणून दिली 😅. परत पुढच्या भागात लवकरच भेटूयात. तोपर्यंत मस्त हसा स्वस्थ्य रहा 😇

— लेखन : सुप्रिया सगरे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800