नमस्कार मंडळी.
गेल्या काही दिवसांत प्राप्त झालेली वाचकांची पत्रे पुढे देत आहे.
१. “समाजभूषण २” परिक्षण म्हणण्यापेक्षा पुस्तकाचं सर्वांगाने केलेले हळूवार निरीक्षण आहे. आपल्यातील यशवंत माणसांचं वेगळेपण कशात आहे ते पहायला मिळते.
पुस्तक निश्चितच उत्तम आणि युवा वाचकांसाठी मार्गदर्शन ठरू शकते.
- जयश्री भिसे.
२. “समाज भूषण २” पुस्तक परिचय आवडला. संपादकजींचे आभार. त्यांच्या शब्द कोशात इम्पॉसिबल.. शब्दच नाही कारण आय त्यांचा मोठा.. आय कोशात आधी येतो.. आय ते पॉसिबल चा प्रवास कितीही खडतर असला तरी ते पूर्ण करतातच.
सुप्रियाजी.. हॅलसंकी पासून हॉल पर्यंत छान फिरवून आणले. ट्रिप रंगतदार.
पूर्ण झालेले वर्तुळ वाचताना खूप गम्मत आली. धन्यवाद चांदेजी
लालबागच्या राजाने.. केलेली मदत वाचून बरे वाटले. मंडळ विश्वस्तांनी असेच सढळ हातांनी देत राहावे हीच सदिच्छा.
दोन्ही कविता विसर्जनाला.. व्यवस्थित न्याय देतात. आवडल्या.
- स्वाती वर्तक. मुंबई
३. ‘समाजभूषण-2’ पुस्तकाचा परिचय राधिका भांडारकर यांनी फारच छान, सुरसपणे सुलिखित केला आहे त्याबद्दल राधिकाताईंचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा!….।
- सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक. नाशिक.
४. ‘समाजभूषण-2’ पुस्तकाचा परिचय खूपच सुंदर. अतिशय मोलाचे संदेश प्रत्यक्ष जगण्यातून दिलेत. तुझे शब्दांकन तर अप्रतिम. छान आढावा घेतला आहेस.
- ज्योत्स्ना तानवडे.
नीला ताई,
एका महान व्यक्तिमत्वाची फार अभ्यासपूर्ण अशी ओळख आपण करून दिलीत, धन्यवाद ताई.
या संदर्भात माझी मी लहान असतांनाची एक आठवण ह्या तुमच्या लेखाच्या निमित्ताने मी सांगते. मी १९६१ साली माझ्या माहेरी कापडण्याला इ. ७ वीत शिकत असतांना माझे वडिल थोर स्वातंत्र्यसैनिक व समाजसुधारक विष्णुभाऊ पाटील यांच्या निमंत्रणावरून भारताचे पहिले अर्थमंत्री मा. चिंतामणराव देशमुख व दुर्गाबाई आमच्या गावी आले होते व गावातर्फे विष्णुभाऊंनी त्यांचा खूप मोठा सत्कार केला होता. दोघे शाकाहारी होते व माझ्या आईने केलेला स्वयंपाक ते आवडीने जेवले होते.
दुर्गाबाईंच्या मुठीने जेवण्याच्या पद्धतीने मी लहान असल्यामुळे मला खूप हसू आले होते.
खूप महान, पण जमिनीवर पाय असणारे लोक होते हे. तेव्हाचा माझ्या वडिलांसहित असलेला फोटो मी शेअर करते आहे. धन्यवाद ताई…
- प्रा सौ सुमती पवार. इंग्लंड.
भाषांतर दिन हा दिनविशेष माहित होता पण इतकी माहिती नव्हती, ती मिळाली.
अभिनंदन आणि धन्यवाद .
- अनिता व्यवहारे. श्रीरामपूर
दुर्मीळ पुस्तके : १०
‘गुलाबी आयाळीचा घोडा’ या लेखावरील अभिप्राय…..
१. वेगळ्या विश्वात घेऊन जाणाऱ्या कथांचा सुंदर परिचय. धन्यवाद आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
- श्री प्रल्हाद जाधव, माजी संचालक (माहिती)
२. In the rare book series, “Gulabi Ayalicha ghoda” is the tenth such book on which appreciator Vilas kudke has thrown light. The book is the collection of russian stories translated in Marathi by Anil Havaldar. He rendered an excellent transaction that Russian govt did it publication there which is enough to prove its importance. The stories though reflect Russian way of life,it’s much similar to human behaviour elsewhere. Most of the stories are touching n mirror human emotions.
In this “Maldaviayatil sharafache diwas, Baykoche hat , title story,”Gulabi Ayalicha ghoda” and several other stories are heart moving. Gheun ghada geli panyala” also depicts lives of rural women. Arcturus is a unique tale of a blind puppy of hound that moves ur feelings. This rare book has almost disappeared after the dissolution of Russia that resulted in halting it’s publication. Our editor Bhujbal sir and Vilasji Kudke’s efforts enabled us to have the taste of this great literary work. We must thank them.
- Shri Ranjitsinh Chandel, Yavatmal
३. खूप छान.
- यशवंत भंडारे
४. छान सर, सुंदर.
- श्री प्रमोद गावकर, कार्यक्रम समन्वयक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
५. सर्व श्री प्रशांत गुलाबराव गायकवाड व सुनील देशमुख, प्रसाद बबन पोळ, अभय बापट, श्री बालाजी काकडे, डाॅ. संभाजी खराट, प्रा गजानन शेपाळ यांनीही लेखास पसंती दर्शवली आहे.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800