नेता माझा देव, नेता माझा जीव
त्याच्यासाठी जगतो, त्याच्यासाठी मरतो
नाही जीवाची पर्वा, नाही भविष्याची चिंता
मी कार्यकर्ता, मी कार्यकर्ता…
मी सभांना जाणार, मी नेत्याला भेटणार
नेत्यासाठी मी कर्जबाजारी होणार
सोडणार नोकरी आता मी सोडणार धंदा
मी कार्यकर्ता, मी कार्यकर्ता…
पोरांची तारांबळ घरात भिकारपण
नेत्यासाठी मात्र करील काहीपण
एका जोमाने आता निवडून आणायचा नेता.
मी कार्यकर्ता, मी कार्यकर्ता….
नेता माझा पैसेवाला त्याचा काय रुबाब
रोज नवीन गाडी रात्री जेवायला कबाब
मी मात्र उपाशी नाही चहाचा दाता.
मी कार्यकर्ता, मी कार्यकर्ता….
मी सरपंच होणार मी गडगंज होणार.
थांबणार नाही आता निवडून सारे आणणार
लाठी मी खाणार संप मी करणार.
जीव गेला तरी हरणार नाही बंदा….
मी कार्यकर्ता, मी कार्यकर्ता…

— रचना : प्रकाश फासाटे. मोरोक्को
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
