आर्थिक अडचणींमुळे दुर्गम भागात राहणाऱ्या समाजातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी त्यांना मदतीचा हात देण्यासाठी येत्या नवरात्र उत्सवात देवदर्शन करताना पूजेच्या साहित्यासह शैक्षणिक साहित्यदेखील देवीसमोर अर्पण करावे असे आवाहन एक वही एक पेन अभियानच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात सण उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. गणेशोत्सवासह नवरात्र उत्सव देखील नऊ दिवस उत्साहात साजरा करण्यात येतो. या उत्सवात लाखो रुपयांची उधळण होते. यावर्षी येत्या १४ ऑक्टोबर पासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. यावेळी होणारे अनावश्यक खर्च टाळून त्याऐवजी वह्या, पेन, पुस्तके, पेन्सिल, कंपास वापरात नसलेले मोबाईल, लॅपटॉप सार्वजनिक नवरात्र उत्सवात देवीला अर्पण करून शैक्षणिक साहित्याचा जागर करावा. नवरात्र उत्सव मंडळांनी देखील भाविकांना तसे आवाहन करावे. नऊ दिवसात जमा झालेले शैक्षणिक साहित्य समाजातील गरजू विद्यार्थ्यांना वितरित करावे किंवा एक वही एक पेन अभियानकडे सुपूर्द करावे असे आवाहन या अभियानचे प्रमुख जेष्ठ पत्रकार राजू झनके यांनी केले आहे.

समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यासाठी किंवा या अभियानच्या अधिक माहितीसाठी सार्वजनिक उत्सव मंडळे, दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी ९३७२३४३१०८ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन देखील या अभियानच्या वतीने करण्यात आले आहे.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800
चांगल्या उपक्रम ाची माहिती दिली धन्यवाद. याचे अनुकरण अन्य भागात व्हावे.