Wednesday, September 17, 2025
Homeपर्यटनआमची युरोप ट्रीप : 9

आमची युरोप ट्रीप : 9

22 जून ला आमचे वासा संग्रहालय व 23 तारखेला Skansen midsummer festival असे बघायचे ठरले. आम्ही आवरून नाश्ता करून साधारण पणे 10.30 ला Soudeteljia हून निघालो आणि स्टॉकहोम मध्ये 11.45 ला पोहोचलो.

स्टॉकहोम सेंट्रल ला पोहोचल्यावर मला अचानक ताप यायला लागला व खूप अशक्तपणा जाणवायला लागला. चालण्याची ताकत नव्हती. काय करावं असा प्रश्न पडला. मी आणि प्रशांत तिथूनच परत Soudeteljia ला जायचे ठरवले. एवढ्या वेळा Soudeteljia Stockholm प्रवास केल्यामुळे मी एकटी जाते म्हणाले पण प्रशांत मला एकटीला सोडणार नाही म्हणाले.

प्रशांत Zurich ला कामासाठी गेले असताना वीकएंड ला चिराग कडे मागच्या ऑक्टोबर मध्ये गेले होते. तेव्हा त्यांनी वासा संग्रहालय बघितले होते. आणि मला माझ्या मुळे मुलांचा फिरायचा मूड अजिबात बिघडवायचा नव्हता. त्यामुळे आमचा swedish guide चिराग ला 😆 आम्ही ईश्वरी ला घेवून त्याच्या मोहिमेवर पुढे रवाना करून परतलो. आम्ही परतलो तरी तुम्हाला ह्या लेखातून वासा संग्रहालय ची टूर आमच्या guide नी सांगितलेल्या माहिती च्या आधारावर नक्की करवणार. त्यात सुट्टी नाही! 😆

वासा संग्रहालय हे एक सागरी संग्रहालय आहे. हे एक swedish warship होते जे measurements मधल्या चुकांमुळे समुद्रात बुडाले होते. हे ship बांधताना engineers swedish होते पण workers Dutch होते. Swedish आणि Dutch measurements मध्ये फरक आहे. ह्या त्रुटी मुळे कम्युनिकेशन गॅप पडला व एवढा खर्च करून त्यावेळेस अद्ययावत बांधलेले लढाऊ जहाज त्याच्या पहिल्याच फिरतीवर जात असताना stockholm पासून थोडे पुढे जाताना समुद्रात 1628 मध्ये बुडाले. त्याचा शोध घ्यायचा बराच प्रयत्न झाला पण त्यावेळी ते कोणाला सापडले नाही. 1955 च्या आसपास एका swedish कंपनी ला ते सापडले पण Swedish सरकारने त्या कंपनी ला जहाज बाहेर काढण्यासाठी परवानगी नाकारली व 1957 मध्ये Swedish सरकारने स्वतः ते जहाज बाहेर काढून त्याची डागडुजी करून त्याचे संग्रहालय बनवायचा निर्णय घेतला.

इतकी वर्ष हे जहाज (1628 ते 1957 म्हणजे 329 वर्षे) पाण्याखाली राहून त्याचे जास्त काही नुकसान झाले नव्हते हे विशेष. म्हणजे ह्याच्या बांधकामाची चांगली प्रत तुम्हाला लक्षात येवू शकते. 1961 ते 1983 हे एका तात्पुरत्या जागी ठेवले होते. त्यानंतर त्यासाठी कायमस्वरूपी जागा ठरवून त्या ठिकाणी नेवून त्याची डागडुजी करून (त्याच आधीच आर्किटेक्ट मेंटेन करून) ते Djurgården परिसरात 15 जून 1990 पासून officially पर्यटकांसाठी खुले झाले.

ह्या जहाजात सहा लेवल (मजले) आहेत व हे सर्व बघता येतात. जे खराब झालेले parts बदलले आहेत त्यांना काही ट्रीट किंवा रंग दिला नाहिये. व जे original parts जे अनेक वर्षे पाण्याखाली होते त्या मधला फरक त्यामुळे लगेच समजतो.

संग्रहालय च्या इमारतीचे लाकडी पॅनल हे गडद लाल, निळा, टार काळा, occur yellow व गडद हिरव्या रंगांनी रंगवले आहेत. त्याच्या छताची उंची जे एक मोठे तांब्याचे छत आहे ते मूळ जहाजाच्या छताच्या उंचीच आहे. ठिकठिकाणी जहाज बांधणीच्या वेळच्या (1600 मधल्या) प्रतिकृती, त्या वेळचे स्थापत्यशास्त्र व त्याची माहिती, जहाज नक्की कुठे बुडाले व त्याची revovery कशी केली ह्याची माहिती आहे. शिवाय त्या वेळचा स्वीडन चा इतिहास, लढाऊ जहाज बांधण्याचा निर्णय का घेतला होता ह्याचीही सविस्तर माहिती आहे. इथे एक थिएटर आहे ज्यात हे जहाज समुद्रातून कसे recover केले ह्या विषयी माहितीपट swedish व इंग्लिश मध्ये दाखवला जातो. आपण इंग्रजी मध्ये आहे तो बघू शकतो.

त्यांची वेबसाईट आहे ज्यात संग्रहालयाची वेळ, तिकीटाची किम्मत व माहितीपटांच्या वेळा (आपल्या ला इंग्रजी पहायचे असल्यास) ह्याची सर्व माहिती आहे.

स्टॉकहोम मध्ये हे बघण्यासारख संग्रहालय आहे. ह्याच्या जवळ अजूनही काही संग्रहालय आहेत. त्यासाठी पाहिजे तर combo तिकीट पण काढता येते. आशा करते पुढच्या वेळी आमच्या मार्गदर्शका बरोबर मला हे याची देही याची डोळा बघता येईल 😃

मुलं घरी यायच्या आधी H&M च्या दुकानात खरेदी करण्यासारखे काही चांगले कपडे मिळतात का बघायला गेले. तिथे चिराग ची एक मैत्रीण तिच्या भावासोबत भेटली. ती आधी H&M मध्ये च काम करत होती. त्यावेळी चिराग ने तिच्या मदतीने भरपूर स्टाफ discount वाले कपडे घेतले होते 😁. आपली मुलं जिथे जातात तिथे जुगाड करतातच. एखाद्या नवीन आलेल्या विद्यार्थ्याला airport वर घ्यायला जायचे असेल तर ज्याचे सलू कार्ड असेल तो विद्यार्थी 25 swedish krona ला ते sublet करतो (म्हणजे gender, age अश्या साधारण मॅच होणार्‍या गोष्टी बघूनच 😆) जे Arlanada Express चे one way ticket 200 krona (200 SEK) आहे.

म्हणजे जाऊन येवून 50 SEK होतात. 😅 म्हणुनच इंडियन जुगाड theory कदाचित Oxford मध्ये शिकवत असावेत. (अश्या गोष्टी शिकवून समजणार आहेत का असाही विचार मनात आला). आपल्याला त्याची अजिबातच गरज नसते कारण आपली जीवनशैली व लहानपणापासून आपल्या नसानसात भिनलेले असते की कुठे व कसे पैसे वाचवता येतील. 😅 ह्याचा अर्थ असा नाही की आपण खर्च करू शकत नाही तर आपला बचत करण्यावर भर असतो. हा खूप मोठा फरक आहे आपल्या व पाश्चात्य संस्कृती मध्ये. आणि तिथे राहूनही चिराग अश्या छोट्या छोट्या गोष्टीत बचत करायचा प्रयत्न करतोय हे ऐकल्यावर तर मला Economist बाबांची मुलगी असल्याचे फार समाधान वाटले 😄 Needs are limited but wants are unlimited. तर अश्या पद्धतीने wants पण limit मध्ये पूर्ण करता येतात. असो 😂

लवकरच पुढच्या भागात भेटूयात.
ता. क. : H&M हा एक प्रसिद्ध Swedish clothing ब्रँड आहे.
क्रमशः

— लेखन : सुप्रिया सगरे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. खूप सुंदर मॅडम.. तिथेच असल्याचा feel येतो आहे..keep writing ❤️

    • Thank you. मनीषा . मॅडम तुमच्या कविता पण येवू द्या. आपण श्री भुजबळ ह्यांना प्रकाशित करण्यासाठी विचारूया. छान लिहिता तुम्ही पण.

  2. खूपच छान वर्णन.
    वाचन करून आमची पण युरोप ट्रीप झाली. 😊

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं