चेरी तू आलीस परदेशातून
बहरली माहेरवाशिणीसम
चेरी तुझे नानारंग करती दंग
तुला नसे सुगंध ||१||
ओढाळ तुझे आगमन
घाली प्रेमाची साद
मनाचे बहरतेस बगीचे
तू कामिनी, मनमोहिनी ||२||
तुझ्या पाकळ्ंयाची बरसात
अंगी अंगी बहरती रोमांच
तुझ्या सवे सोडावे
दुःख, विरहाचे बंध ||३||
उधळून पाकळ्यांना
तू देशी ब्रम्हानंद
साथ थोड्या दिसाची
ओढ लावी जीवाला ||४||
जाताना उधळतेस पाकळ्या
येई कंठ दाटून विरहाने
बांधून ॠणानुबंध
परतून येण्यासाठी ||५||

— रचना : डाॅ.अंजली सामंत. न्यूयाॅर्क, अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
व्वा…सुदंर..मस्त…