प्रश्न आहेत प्रत्येकाचे,
सोडवेल ते रोज कोण ?
म्हणून शहाणे हो व्हावे,
जरा अलिप्त आंतून,
गुरू आपुला आपण….
प्रत्येकाची जाण आगळी,
कुवत अन प्रकृती वेगळी,
कर्म नी कर्मगती निराळी,
प्रारब्ध, पुण्य वेगळेपण,
गुरू आपुला आपण…..
सारे गुंतलेले, किती भाग्यवंत,
धावतात जन, नाही हो उसंत,
कशासाठी सारे, करती सगळे ?
उत्तर हो नाही, गोंधळ संपुर्ण,
गुरू आपुला आपण….
एकदा का जर हे ठरविले,
मन निग्रह ही करून ते झाले,
मग प्रश्न काही सुटूही लागले,
पुन्हा पुन्हा होते, सिंहावलोकन,
गुरू आपुला आपण….

— रचना : हेमंत भिडे. जळगाव
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
गुरू आपला आपण ..छान ..खरंच आहे.