तुझा गोंधळ, गोंधळ, गोंधळ घातला,
जगजननी तू, मायभवानी, आसूरांवर घाला,
तुझी शक्तिपीठे, भारतभूवर सारी विखुरली,
तुझी माया गे, ममता गे, भक्तांवर झाली,
तुझ्या कृपेने, जीवन झाले, सुखांचा सोहळा,
येऊ दर्शना, तुझी गे, भव्य रूपे ती पाहू,
करू यात्रा गे, दिव्य रूपाला, डोळ्यांत साठवू,
तुच जननी, संकटसमयी, करीसी सांभाळा,
काय मागु गे, मागु गे, मागणे मी तुला,
तुझा आशिर्वाद, वरदाई, तोच मला लाभला,
तुच जोजविसी, खेळविसी, बालक आनंदला…!!!

— रचना : हेमंत भिडे. जळगाव
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800