आदिशक्ती तू जगदंबा, महालक्ष्मी,
महासरस्वती, अंबामाता, स्कंदमाता,
कात्यायनी, दुर्गा, महागौरी, साध्दिदात्री
आसूरांच्या वधासाठी आलीस नऊ रूपा ||१||
अधर्माचा करशी नाश म्हणोनी
नवरात्री करती तुझा जागर
विविध रूपे भजती भक्त सारे
आदिमाता तू दयेचा सागर ||२||
स्री रूपात तुच वसशी माता
मानवरूपी राक्षस नडती
तेव्हातू होते चंडिका, कालिका
अन्यायावर मात करण्यास धाडसी ||३||
स्रीचे जीवन रोजचा करशी संघर्ष
सतत प्रतिकारास तू होते सज्ज
घरीदारी जगण्याचा करशी संघर्ष
तुच विविध रूपे घेऊनी सज्ज ||४||
सावित्री, अहिल्या, जिजाऊ
लक्ष्मीबाई, येसूबाई, सिंधूताई
आदिशक्तीची तुझीच रूपे
तुझ्या प्रसादे सदा सुख विराजे ||५||
— रचना : अंजली सामंत. न्यूयाॅर्क
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800