अंबाजोगाई माता योगिनी भवानी
आदिमाया शक्ती दंतासुर मर्दिनी ।।धृ।।
दंतासूर असुराने मांडला उन्माद
योगेश्वरी देवीने केला असुर वध
पारिपत्य करून अभय वरदानी ।।1।।
पार्वतीने केले जगाला प्रकाशभूत
ब्रह्मा-विष्णू-महेश देवता अंतर्भूत
भौतिक अणु शक्ती चैतन्य योगिनी ।।2।।
वैजनाथ देवीचा विवाह सुनियोजित
लग्न मुहूर्त टळला झाला विवाह रद्द
कुमारिका झाली आंबेजोगाई वासिनी ।।3।।
सिद्धलिंग पावन नृसिंह वदन
मूळ पीठ रेणागिरी नांदे संत स्थान
महारुद्र भैरव नागझरी वसुनी ।। 4।।
मराठीचे आद्यकवी मुकुंदराज
“विवेकसिंधु” ग्रंथ करते कविराज
दासोपंतांचा आधिवास पवित्र स्थानी ।।5।।
अंबा बैसली जयंती नदीच्या तिरी
भक्तांना देई वर योग साधना करी
कुलदेवीला प्रार्थूया देई संजीवनी ।।6।।

— काव्य : श्री अरुण गांगल. कर्जत, रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800