जय देवी जय देवी
सद्बुद्धी द्यावी
मनोभावे गातो अंबे
तुझी थोरवी ।। ध्रुव।।
संत महंत ऋषि मुनी
त्रस्त होते देव
पाठीराखी सज्जनांची
माते तू सदैव ।।१।।
चंड मु़ड महिषासुर
मारिले असुर
आनंदाने तुझ्या भोवती
धरतो माते फेर ।।२।।
ब्रह्मा विष्णु महेशावर
तुझाच माते अधिकार
मांगल्याची मूर्ती तू
दूर करिशी विकार ।।३।।
आदिशक्ति अंबे तुझी
वंदितो नऊ रुपं
ब्रह्मांडाची स्वामिनी तू
महाशक्ति रूप ।।४।।
शैलपुत्री ब्रह्मचारिणी
चंद्रघंटा कुष्मांडा माँ
स्कंद माता कात्यायनी
कालरात्री माँ ।।५।।
महागौरी सिद्धिदात्री
रूपे तुझी नऊ
मनोभावे माते तुझी
आरती आम्ही गाऊ ।।६।।

— रचना : राजेंद्र वाणी. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
श्री. वाणी साहेब, नवी आरती फारच छान जमली आहे 🌷🌹💐 अभिनंदन…… आर्किटेक्ट श्रीकांत चव्हाण