संकटांचे ऋणी व्हावे, संकटांना आव्हान द्यावे,
बदल करती आपल्यातील, ठरवून न करू स्वभावे,
येवोत भीषण संकटे, कळू दे मजला दृढता,
कुठवरी मी तरून जातो, काय आहे कमतरता ?
कुठे मी कच खातो, कुठे मागेच जातो,
शक्ती कुठे पडते कमी ? की भावनांची गुलामी ?
कुठे बुद्धी कुंठते, कुठे नक्की खूपते,
कुठे अहंकार खोटा, कुठे स्वभाव प्रकटे,
संकटे हे दावती, म्हणून करा सामना,
सज्ज नी तत्पर रहा, करा एकाग्र त्या मना,
स्वच्छ ठेवा दृष्टीला, स्थीर ठेवा भाव रे,
मात करा जिंकूनी, विजय करा ते साजरे…!!!
— रचना : हेमंत भिडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800