नमस्कार मंडळी.
आपल्या न्यूज स्टोरी टुडे वेबपोर्टलचे ठाणे येथे आज स्नेहमिलन आयोजित केल्या बद्दल श्री हेमंतजी व सौ मेघना साने यांचे मनःपुर्वक आभार. हे स्नेहमिलन नक्कीच अविस्मरणीय ठरेल असा विश्वास वाटतो. या निमित्ताने आपल्या पोर्टलवर एक दृष्टिक्षेप टाकणं उचित होईल असे वाटते.
न्यूज स्टोरी टुडे www.newsstorytoday.com हे आंतरराष्ट्रीय मराठी पोर्टल आहे.
या पोर्टलची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या हे पोर्टल ९० देशात पोहोचले असून ५ लाखाहून अधिक याचे व्ह्युज आहेत.
मराठी भाषा, बातम्या, लेख, साहित्य, संस्कृती, कला, पर्यटन, सेवा याचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी हे पोर्टल महत्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे देश विदेशातील लेखक, कवी, वाचक, विविध क्षेत्रातील व्यक्ती या पोर्टलशी जोडले गेले आहेत आणि जोडले जात आहेत.
या वेबपोर्टल वर आता पर्यंत दररोज एक लेख, बातमी, साहित्य तसेच काही विशेष प्रसंगी अनेक, अशा ९०० हून अधिक कविता, तर वाचक लिहितात.. या सदरातून वाचकांची पत्रे प्रसिध्द होत आहेत.
लेखमाला
१) अमेरिका स्थित डॉ गौरी जोशी कंसारा : थोर कवी व त्यांच्या कवितांवर आधारित “मनातील कविता” : २४ भाग
२) प्रा डॉ किरण ठाकूर : “बातमीदारी करताना” : ३५ भाग
३) सौ वर्षा महेंद्र भाबल : “जीवन प्रवास” : ३७ भाग
४) निवृत्त डीवायएसपी सुनीता नाशिककर : “मी, पोलीस अधिकारी” : ३० भाग
५) वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुलांच्या जीवनावरील डॉ राणी खेडीकर : “लालबत्ती” : ४७ भाग
६) प्रा विसुभाऊ बापट : “कुटूंब रंगलंय काव्यात” : ५३ भाग
७) टिव्ही कलाकार गंधे काका : गिरनार परिक्रमा : ७ भाग
८) डॉ भास्कर धाटावकर : “माझी कॅनडा अमेरिका सफर” : ११ भाग
९) लेखिका प्रतिभा चांदूरकर : कथा माला, स्वप्नरंग स्वप्नीच्या : २१ भाग
१०) श्री हेमंत सांबरे : “सावरकर समजून घेताना” : ५ भाग
११) प्रा डॉ विजया राऊत, नागपूर : “महानुभावांचे मराठी योगदान” : २५ भाग
१२) अमेरिका स्थित तनुजा प्रधान : भावलेली गाणी : १२ भाग
१३) तृप्ती काळे : “महामारी आणि विश्वाचा नवोदय” : १५ भाग
१४) श्री प्रवीण देशमुख : “वर्धा साहित्य संमेलन” १२ भाग
१५) श्री विकास भावे : ओठावरली गाणी : १०० भाग
१६) प्रिया मोडक : राग सुरभी : ३५ भाग
१७) प्रतिभा चांदूरकर : “अमेरिका : माझ्या दृष्टीकोनातून”
१८) मेघना साने : “माझी ऑस्ट्रेलिया सफर”
१९) डॉ शार्दुल चव्हाण : आयुर्वेद उवाच : १६ भाग
२०) क्षमा प्रफुल्ल (नवी दिल्ली) : सहज सुचलं म्हणून : ११ भाग
विद्यमान लेखमाला
१) प्रकाश चांदे : अवती भवती
२) विलास कुडके : दुर्मिळ पुस्तके
३) संगीता कुळकर्णी : साहित्य तारका
४) निवृत्त माहिती संचालक सुधाकर तोरणे : मी वाचलेले पुस्तक
५) आमची युरोप सफर : सुप्रिया सगरे.
६) ललित : अनुपमा मुंजे.
नियमित सदरं
१) पुस्तक परिचय
२) पर्यटन
३) हलकं फुलकं
४) चित्रसफर
५) आठवणीतील व्यक्ती
६) दिन विशेष
७) यश कथा
८) संस्था परिचय
९) “माहिती”तील आठवणी
१०) ललित
११) पाककला
प्रकाशित विशेषांक
१) डॉक्टर म्हणजे देव
२) आषाढी एकादशी
३) स्वातंत्र्य दिन
४) डॉ बाबासाहेब आंबेडकर: ३
५) सिंधुताई सकपाळ
६) डॉ अनिल अवचट
७) लता मंगेशकर
८) मराठी भाषा
९) महात्मा फुले
१०) सुरेश भट
११) तंबाखू विरोधी दिन
१२) बालदिन
१३) संविधान दिन
१४) पर्यावरण
१५) गुरू पौर्णिमा
प्रकाशने
न्यूज स्टोरी टुडे पोर्टलवर प्रकाशित झालेल्या लेखमाला पुढील पुस्तकात रूपांतरित झाल्या आहेत.
१) समाजभूषण.
लेखक : देवेंद्र भुजबळ.
भरारी प्रकाशन, मुंबई
२) मराठी साता समुद्रापार.
लेखिका : मेघना साने.
ग्रंथाली प्रकाशन, मुंबई
३) जीवन प्रवास
लेखिका : सौ वर्षा महेंद्र भाबल
न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स,
नवी मुंबई
४) मी, पोलीस अधिकारी
लेखिका : सुनीता नाशिककर
न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स,
नवी मुंबई
५) समाजभूषण २
लेखिका : रश्मी हेडे.
न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स,
नवी मुंबई
६) माझी कॅनडा – अमेरिका सफर
लेखक : डॉ भास्कर धाटावकर
चैतन्य प्रकाशन, मुंबई.
स्नेहमिलन
न्यूज स्टोरी टुडे वेबपोर्टल चे लेखक, कवी, अन्य सर्व संबधित यांचे अनौपचारिक स्नेहमिलन हा एक आगळा वेगळा उपक्रम आहे.
या स्नेहमिलनाचे वैशिष्ट्य म्हणजे ते अतिशय अनौपचारिक आणि घरीच असते. इथे कुणी अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, सूत्र संचालक असे काही ही नसते. निखळ एकमेकांची ओळख, अनुभव, विचारांची देवाणघेवाण, गप्पागोष्टी असे लोभसवाणे स्वरूप असते.
आता पर्यंत संगमनेर, नाशिक, पुणे, विरार, नवी मुंबई, सातारा, न्यू जर्सी (अमेरिका) येथे स्नेहमिलन आयोजित झाले आहे.
असे हे अनोखे वेबपोर्टल आफ्टरनून, फ्री प्रेस जर्नल, डी एन ए (झी मीडिया), एशिएन एज (डेक्कन क्रोनिकल) या मुंबईतील प्रतिष्ठित इंग्रजी वर्तमान पत्रांमध्ये व काही काळ टिव्ही 9 आदी ठिकाणी पत्रकार, सिनिअर कोरोस्पॉडंट म्हणून आपल्या पत्रकारितेचा ठसा उमटवलेल्या देवश्री भुजबळ हिने कोरोनाच्या भयंकर काळात लोकांना धीर मिळावा, दिलासा मिळावा, योग्य माहिती मिळावी या साठी काळाची पावले व डिजिटल पत्रकारितेचे महत्व ओळखून २२ जुलै २०२० पासून सुरू केले. यासाठी तिने या माध्यमाचे स्वतः प्रशिक्षण घेतले.
निवृत्त माहिती संचालक तथा माजी दूरदर्शन निर्माते देवेंद्र भुजबळ हे या पोर्टलचे संपादन तर त्यांच्या सहचारिणी सौ अलका भुजबळ या पोर्टलची निर्मिती करीत असतात.
पुरस्कार
१) जनमत घेऊन अप्रतिम मीडिया संस्थेतर्फे देण्यात येणारा विकास पत्रकारितेतील अत्यंत मानाचा असणारा राज्यस्तरीय चौथास्तंभ पुरस्कार मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते एका शानदार सोहळ्यात न्यूज स्टोरी टुडे ला पत्रकार दिनी, ६ जानेवारी २०२३ रोजी यशवंतराव चव्हाण केंद्र, नरिमन पॉईंट, मुंबई येथे प्रदान करण्यात आला.
२) पोर्टलचे सांस्कृतिक योगदान लक्षात घेऊन एकता पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार यांच्या हस्ते साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे प्रदान करण्यात आला.
३) नवी मुंबईतील मराठी साहित्य, संस्कृती, कला मंडळातर्फे मराठी भाषा दिनी, २७ फेब्रुवारी २०२३ रोजी विशेष सन्मान करण्यात आला.
४) पोर्टल च्या निर्मात्या म्हणून सौ.अलका भुजबळ यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार, ठाणे येथे गडकरी रंगायतन मध्ये ८ जानेवारी २०२३ रोजी प्रदान करण्यात आला.
५) पोर्टल चे सामाजिक योगदान म्हणून माणुसकी सेवा गौरव पुरस्कार २५ फेब्रुवारी २०२३ रोजी नाशिक येथे प्रदान करण्यात आला.
“या पोर्टलला मिळालेले व मिळणारे हे यश म्हणजे आपण सर्व लेखक, कवी, विविध कारणांनी पोर्टल शी जोडल्या गेलेल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचे जणू प्रतीकच आहे” असे म्हणणे योग्य ठरेल.
आपले प्रेम, स्नेह, सहकार्य पुढेही मिळत राहील, असा विश्वास वाटतो.
— टीम एनएसटी.
www.newsstorytoday.com
☎️ 1) 9869484800
2) 9869043300
3) 022 27754041
ईमेल : devendrabhujbal4760@gmail.com
न्यूज स्टोरी टुडे वेबपोर्टलला मिळत असलेले यश ऐकून मी ह्याच पोर्टलमुळे लेखिका म्हणून सर्वांसमोर आले. हे माझे भाग्य समजते. निर्माती व प्रकाशिका सौ.अलका तर संपादक श्री.देवेंद्रसर मला गुरु समान आहेत. धन्यवाद सर ! 🙏