Tuesday, July 1, 2025
Homeसाहित्यस्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

गुलामगिरीतूनी झालो स्वतंत्र
संविधानाने दिली समानता, न्याय
सत्य निष्ठा, आरोग्यसेवा सुविधा
केली प्रगती सर्व क्षेत्रात ||१||

आज स्री वरी होतो अन्याय
तिचा जन्म ठरतो मरण
सर्व क्षेत्रात तिची धडाडी
तरी घरात, दारात तिचे सरण ||२||

बळिराजाचा रोजचा बळी
सैन्य रोजच पडे शत्रूस बळी
युवा पिढी पैश्यामागे धावे
मनोरूग्ण नायक, नायिका मरती ||३||

नशेने डुंबली युवा पिढी
वृध्दाश्रमाच्या वाढती छत्र्या
परदेशात ज्ञानाची किंमत
भारतात ज्ञानाकडे पाठ ||४||

विकासाच्या प्रवाहात जो न आला
त्यालाच द्याना लाभाची वाट
ज्ञाना समोरी समान सारे
देशसेवा करा सक्तीची बात ||५||

महागाई, मंत्र्यांचे अव्यापार
टाळा आता, न्याय वाढा समान
भ्रष्टाचार टाळा, योग्यतेने पद भरा
तरच स्वातंत्र्याचे करू अमृतपान ||६||

डॉ अंजली सामंत

— रचना : अंजली सामंत. डहाणू
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. अंक खूपच छान आहे. सर्व सदरे, लेख, वृत्त, पुस्तक परिचय उत्तमच आहेत. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
    -मधु नेने, कार्यकारी संपादक, सज्जनगड मासिक, सातारा. (मु.पो. वाई, जि. सातारा.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on ज्येष्ठांनो, छळवाद विषयक कायदा समजून घ्या ! – प्रमोद ढोकले
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अष्टपैलू सुचिता पाटील