Friday, November 14, 2025
Homeलेखदिवाळी सण मोठा

दिवाळी सण मोठा

दिवाळी हा सण अश्विन वैद्य त्रयोदशीपासून कार्तिक शुद्ध द्वितीय पर्यंत असतो. पाचही दिवशी आनंदकारक घटना घडल्या याची आठवण म्हणून दिवाळी साजरी केली जाते.

दिवाळीची सुरुवात आकाश कंदील, दिवे लावून केली जाते. दारासमोर रांगोळ्या काढल्या जातात.

दिवाळीत शंकरपाळे, चिवडा, लाडू चकल्या, करंज्या, अनारसे मालपुवा करून देवाला नैवेद्य दाखवला जातो. नवनवीन वस्त्र खरेदी केले जाते. लहान मुले फटाके, फुलबाजा, भुई नळे उडवतात. किल्ले बनवतात. व्यापारी वही पूजन करतात.

खरंतर दिवाळीला खरी सुरुवात वसुबारस पासून होते. गाय आणि वासराची पूजा केली जाते. सुहासिनी सवत्स गाईची पूजा करतात. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच गहू, मूग वज्र आहे.
अश्विन वद्य त्रयोदशी धनत्रयोदशी साजरी केली जाते. असे मानले जाते जो दीपदान करील त्याला अपमृत्यू येणार नाही म्हणून मंगल स्नान करून दीप लावला जातो. दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावला जातो. इतर वेळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावणे अशुभ मानले जाते.

अश्विनवद्य चतुर्दशीला नरक हे नाव आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून सोळा हजार बंदिस्त स्त्रियांना बंधमुक्त केले व सूर्योदयापूर्वी श्रीकृष्ण परतले. म्हणून या दिवसाची स्मृती म्हणून सूर्योदयापूर्वी स्नान केले जाते व दिवे लावले जातात.

अश्विन वद्य अमावस्येला लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मी पूजेला विशेष महत्त्व असते. घरातल्या लक्ष्मीची, सुवर्ण वस्तूंची पूजा केली जाते. झाडूची पूजा केली जाते. तसेच स्वच्छतेला विशेष महत्त्व दिले जाते.

जैन लोक महावीरांची पूजा दिवे लावून करतात. याच दिवशी त्यांना निर्वाण मिळाला.

कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा असते. मागची कथा विष्णू देवाने वामन अवतार घेऊन बळीराजाला पाताळात लोटले. असे मानले जाते जो दीपदान करील त्याला यम यातना भोगाव्या लागणार नाहीत.

मग विक्रम संवत सुरू होतो. यालाच दिवाळी पाडवा म्हणतात. पती-पत्नीला ओवाळते. पती पत्नीस ओवाळणी देतो.

दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हे नाव आहे. अशी कथा सांगितली जाते की, यम आपल्या बहिणीकडे गेला तेव्हा तिने त्याला ओवाळले म्हणून आपणही भावाला ओवाळतो. ही परंपरा अशीच सुरू राहावी म्हणून अशा प्रकारे दिवाळी साजरी केली जाते.

वर्षा भावसार

— लेखन : वर्षा भावसार
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. खूप मार्मिक व सुंदर विवरण,
    सर्वांना दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा.
    आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे .

  2. वर्षा मॅडम तुमचा आर्टिकल ची वाट पाहत होतो. तुमचा आर्टिकल मध्ये विशेष माहिती असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on “वाढत्या आत्महत्या : या “शिक्षणा”चा काय उपयोग ?”
सौ.मृदुला राजे on कॅन्सर म्हणजे “कॉमा” !