आनंदवन मित्र मंडळ, नवी मुंबई आणि न्युज स्टोरी टुडे वेब पोर्टल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आनंदवन व अन्य ठिकाणांच्या पाहणीस काल पासून छान सुरुवात झाली.
पहिल्याच दिवसाचे वैशिष्ट्य ठरले ते म्हणजे डॉ विकास भाऊ आमटे यांच्याशी झालेला दिलखुलास संवाद.या संवादात त्यांनी आनंदवन चा प्रवास अत्यंत भावपूर्ण पद्धतीने उलगडून दाखवला. तसेच समाजाची कुष्ठ रुग्णांकडे बदलण्याची अजूनही किती गरज आहे, हे पोट तिडकिने सांगितले.
यावेळी सौ वर्षा महेंद्र भाबळ यांनी लिहिलेले, न्युज स्टोरी टुडे पोर्टल वर प्रसिध्द झालेले आणि आता न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशन ने पुस्तक स्वरूपात प्रसिध्द केलेले “जीवनप्रवास” हे त्यांचे आत्मचरित्र, नुकताच संत नामदेव उत्कृष्ट चरित्र पुरस्कार प्राप्त पुस्तक, श्री विकास आमटे यांना भेट दिले. याप्रसंगी प्रकाशिका सौ अलका भुजबळ या व इतर मान्यवर उपस्थित होते.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800