तसा नेहमीच बहरून, येतो तो गुलमोहर,
काही विशेष दिवशी, खास खुलतो तो मोहर,
काही वेळा तेच रंग, जरा जास्तच खुलती,
सोबतीस कोण ? येतसे ह्रदयांतून पावती,
सुहास्य मुखावरी, जे आपोआप येते,
ना खोटा मुखवटा, हो प्रेम आहे जेथे,
खुलते आहे सारे बघून, ही संस्कृतीधारा,
रूतुंसवे मोहरून येते, श्रीमंती हो घरा,
मनामनातून तो बहरावा, गुलमोहर खरा,
जावे सारे राग, लोभ, मनीचा हो निचरा,
ह्रदय फुलावे प्रत्येकाचे, प्रेम उदंड व्हावे,
या धरतीवर, मुक्त मनाला स्वर्गसुख लाभावे….!!!
— रचना : हेमंत भिडे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
हृदय फुलावे प्रत्येकाचे प्रेम उदंड व्हावे
कविते बरोबर ही ओळ मला खुप आवडली.
गोविंद पाटील जळगाव जिल्हा जळगाव.