येत्या २०३० पर्यंत राजकीय इच्छाशक्ती आणि अन्य सर्व घटकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच शाश्वत विकास ध्येय मोठ्या प्रमाणात गाठली जाऊ शकतात आणि त्यासाठी ग्रामीण व शहरी पत्रकारांच्या माध्यमातून राबवयाचा “अप्रतिम महावक्ता पब्लिक टॅलेंट रियालिटी शो सिरीज – २०३२ शाश्वत विकास ध्येयाच्या दिशेने” यासारख्या परस्पर परस्पर संबंध व संवाद उपक्रमांची गरज आहे, असा सूर अप्रतिम मीडिया फाउंडेशन मुंबई येथे आयोजित पहिल्या महाराष्ट्र शाश्वत विकास ध्येय परिषदेत उमटला.
या परिषदेसाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक रवींद्र कुलकर्णी, महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाचे संचालक जे.ई. चौधरी, ज्येष्ठ पत्रकार सर्वश्री मधु कांबळे, यमाजी मालकर तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे, व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, माहिती व जनसंपर्क खात्याचे निवृत्त संचालक देवेंद्र भुजबळ, शैक्षणिक सल्लागार अजित आर. थेटे, विकास नवाळे मुख्याधिकारी एरंडेल नगरपरिषद, यांच्यासह इतर अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.
या सर्व पाहुण्यांचे संयोजक डॉ.अनिल फळे यांनी ‘अप्रतिम प्रतिमा’ देवून स्वागत केले. सोनल जाधव-शेटे यांनी संपूर्ण परिषदेचे सूत्र संचालन केले. त्याचप्रमाणे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष कॅबिनेट दर्जा राजेश क्षीरसागर, राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण खात्याचे मंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व अंबादास दानवे, राष्ट्रवादी पक्षाचे नेते अनिल देशमुख, आमदार सर्वश्री संजय शिरसाट, प्रदीप जयस्वाल, आशिष जयस्वाल रामटेक; व सत्यजित तांबे, नाशिक; इत्यादी मान्यवरांनी आपल्या शुभेच्छा कळविल्या. राष्ट्रपती दौरा व कोकणातील विविध कार्यक्रमांच्या व्यस्ततेमुळे वेळ दिलेली असतानाही मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे अपरिहार्य कारणास्तव परिषदेला उपस्थित राहू शकले नाहीत.
या परिषदेत सकाळी 11 ते रात्री नऊ वाजेपर्यंत कामकाज झाले. यादरम्यान उद्घाटन सत्र, शाश्वत विकास ध्येय गाठण्यासाठी शासन सामाजिक नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था आणि पत्रकार यांचा कसा सहभाग असावा यासंबंधी विशेष चर्चासत्र, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना आणि ध्येयसिद्धी; ध्येय गाठण्यासाठी पत्रकारितेचे योगदान अशा तीन विषयांवर मंथन झाले. महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या २८ विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आपापली मते व्यक्त केली. या सर्व संस्थांचा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या शुभहस्ते खालील संस्थांचा अप्रतिम मीडिया फौंडेशनच्या वतीने ‘अप्रतिम गौरव’ देवून सन्मान करण्यात आला.
१. इंडियन रेड क्रॉस सोसायटी, अहमदनगर जिल्हा शाखा श्रीरामपूर
२. संस्थापक अध्यक्षा- सौ.अरुणा आजगावकर, बहुजन समाज परिवर्तन सामाजिक संस्था नवेनगर-महाड जि.रायगड
३. डॉ.राजेश पाचारकर मित्र फौंडेशन, बोर्ली पंचतन, ता.श्रीवर्धन, जि. रायगड
४.श्री. दीपक जोशी व सहकारी, जय जवान, जय किसान शेतकरी गट, देवगाव, पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर
५. श्री.वीरेंद्र धोका, सचिव, महाराष्ट्र मारवाडी मंच.
६. श्री.गोविंद मुंडकर, ज्येष्ठ पत्रकार – सामाजिक कार्यकर्ते
७. श्री.रवींद्र कर्वे सर.विद्यार्थी विकास योजनेचे प्रणेते
८. परमपूज्य श्रीपाद अनंत वैद्य उर्फ काका महाराज सेवा परिवार
९. सौ.प्रतिक्षा बिबवे, एन रिच फौंडेशन, पुणे
१०. श्री.सुहास सहस्त्रबुद्धे, ज्येष्ठ नागरिक – एक उपक्रमशील व्यक्ती
११. डॉ.संतोष पाटील, अध्यक्ष, अभिनव प्रतिष्ठान
१२. श्री. गुरुनाथ साठेलकर. रा. खोपोली, ता. खालापूर, जि. रायगड, महाराष्ट्र,
१३. श्री इक्बाल मामदानी, मामदानी हेल्थ अँड एज्युकेशन ट्रस्ट, मुंबई
१४. श्री.गिरीश हंचनाळ, आस्था फौंडेशन औरंगाबाद
१५. सौ.राजश्री हेमंत पाटील, अध्यक्षा, गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी, नांदेड
१६. श्री.सिद्धार्थ इंगळे, अध्यक्ष, महाराष्ट्र student युनियन, मुंबई
१७. डॉ.प्रमोद साळसकर,ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक
१८. श्री.चंद्रकांत साळुंखे,अध्यक्ष, एसएमई इंडियन चेम्बर्स मुंबई
१९. प्रा.वृषाली मगदूम, सामाजिक कार्यकर्त्या, व्याख्यात्या, लेखिका
२०. श्रीमती रुबी सिंग, प्रीती सिंग आणि विकास सिंग,एन पी एस फौंडेशन, नवी मुंबई
२१. आरोग्य कल्याण समिती, उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर, जि. संभाजीनगर
२२. श्री.मंगेश चिवटे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष, मंत्रालय, मुंबई
२३. एस डी जी कक्ष, नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई
२४. श्री. प्रीतिश लाड, विश्वस्त, विश्वधर्मासार फौंडेशन, पुणे
२५. श्री. संजय भुसारी, विश्वस्त, साई स्मारक समिती, पाथरी, जि. परभणी
२६. श्री. राहुल चक्रे श्री. डोलेश्वर मंदिर ट्रस्ट, पैठण
२७. श्री.संदीप काळे, संस्थापक अध्यक्ष, व्होईस ऑफ मीडिया, मुंबई.
२८. श्रीमती आशा कुलकर्णी. हुंडा बंदी चळवळ, मुंबई.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800