Sunday, September 14, 2025
Homeबातम्यासाहित्य सम्राट महोत्सव उत्साहात संपन्न

साहित्य सम्राट महोत्सव उत्साहात संपन्न

साहित्य सम्राट पुणे संस्थेचे शतकोत्तर अमृत महोत्सवी राज्यस्तरीय १७५ वे कविसंमेलन विशाल सह्याद्री सदन,सदाशिव पेठ पुणे येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोदजी अष्टुळ यांनी आयोजित केले होते.
“कवींनी आपल्या कविता फाडल्या पाहिजेत. शंभर कवितांतून एक चांगली कविता तयार होईल. कवीने कवितेला आपले अपत्य समजून भावनिक न होता. सामाजिक संवेदनेने समाजाला दिशा देणाऱ्या कविता लिहणे अपेक्षित आहे. जागतिक साहित्यिकांनी खऱ्या जाणिवांचे साहित्य जगापुढे आणले. त्यासाठी मेंदूमध्ये विचारांच्या मुंग्या सतत चावल्या पाहिजेत” असे विचार कवीसंमेलनाचे अध्यक्ष प्रा.डॉ.प्रभाकर देसाई यांनी यांनी व्यक्त केले.

मंचावर ज्येष्ठ कवी म. भा. चव्हाण, कार्यक्रमाच्या अध्यक्षा निबंधक बार्टी इंदिरा अस्वार- डावरे, मनपा पुणे मराठी भाषा संवर्धन समिती सदस्य अनिल गोरे आणि संस्थापक विनोद अष्टुळ उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रथम मान्यवरांच्या हस्ते संविधान ग्रंथ पूजनाने झाली. संविधान उद्देशिकेचे वाचन संथा पद्धतीने झाले.
स्वागताध्यक्ष विनोद अष्टुळ आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की साहित्य सम्राट पुणे ही संस्था गेली अनेक वर्षे सातत्याने प्रत्येक महिन्यात कविसंमेलन घेत आहे. संस्थेने साहित्याची चळवळ सामान्य माणसांपर्यंत पोहोचावी म्हणून पादचारी रस्ता, बगीचा, मंदिरे, सोसायटी, सभागृहे आणि स्मशानभूमी अशा ठिकाणी जाऊन मराठी, हिंदी, उर्दू, ख्रिस्ती साहित्यिकांना सोबत घेऊन कविसंमेलने घेत आहे. विशेष म्हणजे वारीतील कविसंमेलन, शब्द गोड दिवाळी, श्रावण सहल आणि शाळा, महाविद्यालयातून ‘काव्य बोले काळजाला’ असे उपक्रम घेतले जात आहेत.
मराठी भाषा प्रत्येकाने व्यवहारात आणावी. मराठी अगदी सोपी असून ती मनाला भिडणारी आहे. असे उद्घाटक अनिल गोरे म्हणाले.

कवींनी जे लिहायचे ते निर्भिडपणे लिहिले पाहिजे. तसेच काव्यातून कार्यक्रमाच्या अध्यक्षा डावरे यांनी मत व्यक्त केले.

कवी सुरेश पाटोळे यांची कविता– चोळी व गझलकार विजय वडवेराव यांच्या कवितांना साहित्य सम्राट राज्यस्तरीय काव्य गौरव पुरस्कार, बोल्ड कवी म.भा. चव्हाण यांना संस्थेतर्फे मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
श्रीमती सुभा लोंढे यांच्या “चिमणचारा “या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
शतकोत्तर अमृत महोत्सवी कविसंमेलनात राज्यातून सत्तरहुन अधिक हिंदी मराठी कवी कवयित्रींनी आपल्या बहरदार गझला आणि कविता सादर केल्या. श्रीशैल सुतार सोलापूर, गीताश्री नाईक मुंबई, शांतीलाल ननावरे बारामती, रुपाली भोरकडे शिक्रापूर, सुरेश डोळस भोसरी, बबन चव्हाण चाऱ्होली, सुवर्णा पाटील बेळगाव, श्रीराम घडे परभणी, विजयकुमार कांबळे सोलापूर, शिवाजीराव जाधव सातारा, दिनेश कांबळे छ.संभाजी नगर, चंद्रशेखर हाडके कोरेगाव सातारा, अनिल नाटेकर आळंदी, सुजाता भडकवाड धनकवडी, डॉ पांडुरंग बाणखेले शिरूर, आत्माराम हारे पिंपरी, दिनेश गायकवाड नाशिक, जयंत पाठक मधुकर गायकवाड, दीपक नरवडे, गणेश रायभोळे, अशोक जाधव, अशोक शिंदे वालचंद नगर, प्रल्हाद शिंदे चास.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.शरयूताई पवार आणि सीताराम नरके यांनी तर आभारप्रदर्शन किशोर टिळेकर यांनी केले.

— लेखन : बाबू डिसोजा कुमठेकर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
Prashant Thorat GURUKRUPA on असे ही होऊ शकते !
CHANDRASHEKHAR PRABHAKAR KASAR on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अमेरिकन भारतीयांनो “रजा” घ्या !
यश चंद्रकांत करकरे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Shashikant Oak on व्यंग कथा
सौ. सुनीता नितीन फडणीस on व्यंग कथा