नाशिकचं हवापाणी म्हणजे…
गरम हवेपेक्षा सकाळच्या गोड गारव्याची चर्चा करती !
सूर्य मावळतीला कलताच सगळे मोकळ्या हवेकडे पळापळ करती !!
नाशिकचं हवापाणी म्हणजे
नाचविले जाणारे वीर
रहाडीतील धप्पा !
पाच दिवस पेटती होळी
अन् भोवती रात्रंरात्रभर गप्पा !!
नाशिकचं हवापाणी म्हणजे
लग्नमौजींचा धूमधडाका
कूळधर्म आणि कुळाचार !
निवांत उशिराच्या जेवणाला
झणझणीत मिसळीचा रसनेला आधार !!
नाशिकचं हवापाणी म्हणजे
गरम खापरं अन् पत्रं
त्यावर टाकलेले पापडाचे वाळवण
चिमण्या हुसकता हुसकता
उडायची आमच्या सर्वांची दाणादाण !!
नाशिकचं हवापाणी म्हणजे
रामकुंडात पोहणे आणि घरा घरातला थंडावा
पत्ते-कॅरम-क्रिकेटचे डाव !
राजस्थान्यांचे आईस्क्रिम बघताच विसरुन जायचो वडा आणि पाव !!
नाशिकचं हवापाणी म्हणजे
गोदाततीराची वसंत व्याख्यानमाला
एकत्र करती लहान मोठे- बाळ गोपाला…!
वक्ते लई झाले तरी येती
भक्त अखंड ऐकायाला.!!
नाशिकचं हवापाणी म्हणजे
‘साधना’ची खमंग भेळ
मेनरोडवर उगाच करती भटकंती !
यारवीरांची टोळी जमवत
क-हाडी भेळभत्ता वा
गोड ऊसाची रसवंती !!
नाशिकचं हवापाणी म्हणजे
आई-बाई-मावशींचं किर्तनमंडळ, साईनामाचा गजर
गुऱ्हाळाचा आल्या लिंबूचा चवदार रस
पंचवटीतला प्रसिद्ध तो
काळाराम…!
अन् त्याच्या जवळीच
तो गोराराम…!!
नाशिकचं हवापाणी म्हणजे
उन्हाळ्याच्या सुटीत निकालाची धाकधूक
जीव भांडयात पडे होताच पास …!
नवा वर्ग, नवनवे मीत्र
तेंव्हा शाळेची मजा असायची खास…!!

– रचना : डॉ. मधुकर लहानकर
आक्षी बरुब्बर हाय..
नासिकची अशी हाय हवापानी
गरजच नाही इथं दवापानी.. झकास कविता
धन्यवाद