धुसर झाल्या अंधारातील रंगछटा
उजेडाचा हा प्रवास आता
स्पंदनात उमटला भाव नवा
विसरून जाऊ त्या यातना ||
अंधारातील रंगछटा
शिकवून गेले नवे धडे
संकाटातही नको घाबरु
धैर्याने तू चाल पुढे !!
नको उगाळू जूनाच अंधार
नव्या ची ही साथ कर
सोड अंधाराचा कर
प्रकाशाची तू वाट धर !!
तू हसता हसतील सारे
तू रडता कुणी ना मागे
गात जा प्रकाश गाणे
प्रकाशतील मग अंगणी तारे !!
हसरी स्पंदने अवती भोवती
नको बाळगू संकटांची भिती
सुखदुःखा ची ऊन सावली
नियती अखंड खेळत राहती !!
— रचना : आशा दळवी. दूधेबावी- सातारा
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
छान ,प्रकाशाच्या वाटा एकदम मस्त