महाराष्ट्रातील मराठी आणि हिंदी भाषेत लेखन करणारे नागेश शेवाळकर यांनी लिहिलेल्या आणि दुर्वा प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या ‘स्वप्नाचिया देशी’ या कादंबरीचे प्रकाशन ज्येष्ठ पोलीस अधिकारी विवेक देशपांडे यांच्या हस्ते विनय फाऊंटन हेड, हैद्राबाद येथे एका शानदार सोहळ्यात नुकतेच संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीकृष्ण चिकाटे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश धर्म आणि विनय जोशी यांची उपस्थिती होती.
अनंत जोशी, प्रिया जोशी, प्रकाश फडणीस, प्रवीण कावडकर, पुष्कर कुलकर्णी, रामदास कामत, अरुण डवलेकर, उज्वला धर्म, प्रगती रानडे, विनय जोशी, योगेश रायबागी, युक्ता रायबागी, अपर्णा कुलकर्णी, व्यंकटेश कुलकर्णी इत्यादी साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विवेक देशपांडे याप्रसंगी म्हणाले, की शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी विदेशात जाणारांची संख्या भरपूर प्रमाणात वाढते आहे. ते रमतात का, त्यांना सातासमुद्रापार कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो त्याचसोबत इकडे त्यांच्या कुटुंबीयांची काय अवस्था असते हा या कादंबरीचा मुख्य विषय आहे.
आपले मनोगत व्यक्त करताना लेखक नागेश शेवाळकर म्हणाले की, आपल्या भावाला परदेशात पाठविण्यासाठी एक बहीण किती मोठा त्याग करते, विदेशात राहणाऱ्या मुलांचे काही पालक एकत्र येऊन आपल्या देशात नवीन काही करण्यासाठी पाल्यांना कशी मदत करतात यासोबत शेतीचे प्रश्न, मुलींच्या लग्नाच्या अडचणी, तरुण मुलांची हुंडाबंदी विरोधातील विचार अशा अनेक प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. वाचकांना ही कादंबरी निश्चित आवडेल असा विश्वास शेवाळकर यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात प्रसिद्ध नाट्यलेखक रामदास कामत यांनी नाट्य संहितेचे वाचन केले.
प्रिया जोशी यांच्या कवितेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
श्री व्यंकटेश कुलकर्णी यांच्या गझल वाचनाने समारंभाची सांगता झाली.
अनंत जोशी यांच्या ‘काश्मीर-ए-तालिबान या इंग्रजी कादंबरीचेही प्रकाशन झाले.
लेखक नागेश शेवाळकर यांनी उपस्थित लेखकांना स्वप्नाचिया देशी, मोबाईल माझा गुरू, लॉकडाऊन वाहिनी, कोरोना निवास इत्यादी पुस्तके भेट म्हणून दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण कावडकर यांनी केले. तर प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन व्यंकटेश कुलकर्णी यांनी केले.
— टीम एनएसटी ☎️ 9869484800