राष्ट्र संत गाडगेबाबा
गाडगे बाबांनी। घेवून खराटा
स्वच्छ केल्या वाटा।गावोगावी ॥१॥
आरोग्य संदेश ।दिला घरोघरी
निर्मळ अंतरी । मन केले ॥२॥
फाटकी गोधडी। हातात मडके
सर्वांचे लाडके ।होते बाबा ll३ll
किर्तनातूनच। दिला उपदेश
पांघरुन वेश । वैराग्याचा ॥४॥
लोकां पटवली शिक्षण महती
साक्षर करती।सार्या लोका ॥५॥
केला घनाघात।अंध श्रध्देवर
क्रुर प्रथेवर ।अविरत ॥६॥
ईश्वर भेटतो।दीनदुबळ्यांच्या
कष्टी दु:खीतांच्या।सेवेतून ॥७॥
हृदयी निर्मळ।वाणी सडेतोड
वाईटाची खोड।मोडे बाबा ॥८॥
वाईट प्रवृत्ती।पशु बळीवर
केला फटकार। नेहमीच ॥९॥
केला उपदेश।नको जातीभेद
नको धर्म भेद।समाजात ॥१०॥
आता होने नाही।थोर अशी व्यक्ति
निर्मळ ती भक्ति।या जगात ॥११॥

— रचना : अनिसा सिकंदर. दौंड – पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800