आज 25 डिसेंबर. अटलबिहारी वाजपेयींचा जन्मदिवस. या निमित्ताने त्यांच्यावरील कविता सादर करीत आहे. अटलजींना विनम्र अभिवादन.
– संपादक
पंचपंच उषःकाली
सुवर्णकिरणे उधळीत आली
माहे डिसेंबर तारीख पंचवीस
अटलजींची स्वारी आली
कमलदलापरी कोमल मानस
संसदपटु, साहित्यी आस
प्रखर राष्ट्रनिष्ठेची कास
अखिल विश्र्वप्रिय अटलजी खास
प्रधानमंत्री पदी विलसले
समाजकमला विकसित केले
न्याय, नीतीज्ञ, सुसहकारी
विनम्र नेता जनहितकारी
सत्तेची ना कधी लालसा
उज्ज्वल प्रतिमा लोकमानसा
ध्येयधोरणे राबवितांना
सर्वपक्षसमभाव राखिला
— रचना : स्वाती दामले.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800