५ जून या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून “माझी वसुंधरा अभियान अंतर्गत” नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘लोकसहभागातून व़ृक्षारोपण’ ही संकल्पना नजरेसमोर ठेवत “माझी स्वत:ची ऑक्सिजन बँक” या शिर्षकांतर्गत वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
कोव्हीडच्या दुस-या लाटेत ऑक्सिजनचे महत्व मोठ्या प्रमाणावर अधोरेखित झाले. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठा करणा-या वृक्षांची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. हे वृक्षांचे महत्व जाणत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने वृक्षारोपण करावे व त्याचे जबाबदारीने संवर्धनही करावे यादृष्टीने “माझी स्वत:ची ऑक्सिजन बँक” ही वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत आहे.

“झाडे लावू या – सेल्फी काढू या व महानगरपालिकेच्या सोशल मिडीयावर झळकू या” असे आवाहन करीत ही मोहीम राबविली जात असून नागरिकांना वृक्षारोपणाकरिता मोफत वृक्षरोपे महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत उपलब्ध करून दिली जात आहेत. नागरिकांनी वृक्षारोपण करून झाडासोबतचा सेल्फी nmmcvasundhara@gmail.com या इमेल आयडीवर पाठविल्यास त्यांचा फोटो नवी मुंबई महानगरपालिकेच्या सोशल मिडियावर झळकविण्यात येणार आहे.
याबाबतच्या अधिक माहितीसाठी तसेच वृक्षरोपे उपलब्ध करून घेण्याकरिता नागरिकांनी 022-27567064 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावयाचा आहे.
तरी आपले नवी मुंबई शहर अधिक हरित बनविण्यासाठी नवी मुंबईकर नागरिकांनी “माझी स्वत:ची ऑक्सिजन बँक” या वृक्षारोपण मोहीमेत माझे झाड लावून प्रत्यक्ष सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे
– देवेंद्र भुजबळ 9869484800.
👌 सुंदर उपक्रम.
खरोखरच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजन किती महत्वाचा आहे ते अधोरेखित झाले आहे. पर्यावरणातील ऑक्सिजनची कमतरता भरून काढायची असेल तर वृक्षारोपण करुन त्यांचे जतन करणे खुप आवश्यक आहे. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री बांगर साहेब यांनी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सुंदर उपक्रम हाती घेतला आहे. त्या बद्दल श्री बांगर साहेब व नवी मुंबईकर यांचे हार्दिक अभिनंदन 🌹
असे उपक्रम राबवणे ही काळाची गरज धन्यवाद, आरोटे साहेब