समाजमाध्यमांमुळे पत्रकारितेचे द्वार सर्व सामान्य नागरिकांनाही खुले झाले असून ही माध्यमे वापरताना विश्वासाहर्ता, अचूकता, गतिमानता या पत्रकारितेच्या मूळ तत्वांचा प्रत्येक नागरिकाने केला पाहिजे, असे प्रतिपादन ‘न्युज स्टोरी टुडे’ या वेब पोर्टल चे संपादक तथा निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कोकण विभागीय शाखेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
पत्रकारितेच्या इतिहासाचा आढावा घेताना श्री भुजबळ म्हणाले, 29 जानेवारी 1780 रोजी जेम्स ऑगस्टस हिकी या इंग्रजाने बेंगाल गॅझेट हे वृत्तपत्र सुरू करून भारतात पत्रकारितेची सुरुवात केली. पुढे 52 वर्षांनी बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी “दर्पण” हे मराठी व इंग्रजी असे द्वैभाषिक वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेचा पाया घातला. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील वृत्तपत्रांचे महत्वाचे योगदान विशद करून त्यांनी स्वातंत्र्य मिळाल्या नंतरचे पत्रकारितेचे स्वरूप, पत्रकारांसाठी असलेल्या सरकारच्या योजना यांचीही यावेळी माहिती दिली.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, महासचिव डॉ विश्वासराव आरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त
1 जानेवारी रोजी ठाणे येथील टाऊन हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात आरोग्य शिबिर, दिनदर्शिका प्रकाशन, वैद्यकीय योजना कार्ड वाटप, पत्रकार शिबिर, पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्याची सुरुवात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उद्योजक डॉ. संभाजी संकपाळ, संघटनेचे प्रमुख सल्लागार प्रमोद इंगळे, कोकण विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष राजन पाटील आणि सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे महासचिव डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी आपल्या भाषणात संघटनेच्या वाटचालीचा आढावा घेऊन संघटना पत्रकारांच्या हितासाठी करीत असलेल्या कार्याची माहिती दिली.
यावेळी शारदा विद्यालय, वयम मासिक, बेहरूम सोलमन (आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू), भानुदास शिंदे (शैक्षणिक), उमा माळी ( सामाजिक ), सार्था गोरे ( मिस इंटरनॅशनल नक्षत्र ), अमित सिंग ( उद्योजक), डॉ. वनिता गडदे ( सामाजिक), मनसवी चौधरी ( पत्रकार ), प्रवीण जाधव ( पोलीस सब इन्स्पेक्टर ), गोरख पाटील ( सामाजिक ), विश्वनाथ थोरात (सामाजिक), उषा कोथमीरे (सामाजिक), जयश्री जाधव ( सामाजिक ), महेश कदम ( उद्योजक ), प्रभाकर जाधव (ज्येष्ठ साहित्यिक) इत्यादीचा गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी टायटेन मेडिसिटी यांच्यावतीने ठाण्यातील पत्रकारांना वैद्यकीय योजना कार्ड वाटप व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे ओळखपत्र देण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभाग व ठाणे शहर जिल्हा दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे प्रत्यक्षपणे कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याने दृकश्राव्य माध्यमातून त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांच्या कर्तृत्वाचा माहितीपट प्रदर्शित करण्यात आला.
प्रदेश महासचिव विश्वासराव आरोटे यांना ठाणे शहर जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने “जीवनगौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
श्री प्रमोद इंगळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या सोहळ्याचे निवेदन ठाणे शहर जिल्हा सचिव सुबोध कांबळे यांनी केले.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800
योग्य मार्गदर्शन.