पांघर तुझ्या मायेची
ऊब तुझ्या प्रेमाची
सावली तुझी काळजीची
झालीस माई जगाची.
पेटवलीस मशाल सेवेची
सावरलीस निराधार आयुष्य
घडवलीस माणसं
देऊनी आहुती समर्पणाची.
झालीस यशोदा अनाथांची
आधार दिलास हक्काचा
आदर्श घातलास सत्कर्माचा
अपार कष्टाच्या लढ्याचा.
तळपलीस सूर्याच्या तेजाने
दिपवलेस अफाट धैर्याने
जागवलीस मने वक्तृत्वाने
गौरविले यश पद्मश्रीने.
दिवस तुझ्या आठवणींचा
सत्कार तुझ्या त्यागाचा
अतुलनीय कार्याचा
अचंबित प्रवासाचा.
प्रणाम तुझ्या अद्वितीय माणुसकीला 🙏🙏

रचना : मीरा जोशी.
संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800