गंध चाफ्याचा येताना
तुला सोबती आणले
शांत समुद्र किनारी
मन होते विसावले //१//
दिले घेतले वचन
एकनिष्ठ राहण्याचे
एकरुप होऊ दोघे
दिस आले आनंदाचे //२//
गंधाळून जाऊ दोघे
सुगंधित चाफ्यामध्ये
चिंब भिजून जाऊया
सागराच्या लाटांमध्ये //३//
ओंजळीत घेऊ फुले
सुगंधित या चाफ्याची
साद सागराची येते
साक्ष देण्यास प्रेमाची //४//
रंग पिवळा चाफ्याचा
लोचनांना सुखावतो
साथ मिळे तुझी जेव्हा
मोगराही बहरतो //५//
वेड्या मनाला नेहमी
गंध आवडे चाफ्याचा
गोड छायेत चंद्राच्या
खेळ रंगे मिलनाचा/ /६//
— रचना : परवीन कौसर. बेंगलोर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खूप खूप धन्यवाद अगदी मनापासून अशी सुंदर भेट दिली कविता
एकरुपतेने राहील्यानेच माणसांना आनंदाचे दिवस येतील हा चांगला संदेश गंध चाफ्याचा काव्यातून परवीन कौसरताईंनी दिला आहे.
गोविंद पाटील
जळगाव महाराष्ट्र
खूप खूप धन्यवाद